Home महामुंबई मुंबई-सिंधुदुर्ग १०० रुपयांत ‘रिटर्न’

मुंबई-सिंधुदुर्ग १०० रुपयांत ‘रिटर्न’

2

‘स्वाभिमान’कडून येत्या २४, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी आठ तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसेस मुंबईतून सिंधुदुर्गसाठी सोडण्यात येणार आहेत. 

मुंबई – कोकण रेल्वे हाउसफुल झाल्याने गणपतीला गावी जाण्याचा बेत आखणा-या सिंधुदुर्गवासियांना खासगी बसचा आधार घ्यावा लागला.

मात्र, खासगी बसवाल्यांकडून तिकिटांच्या नावावर लूटमार होत असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाणा-या प्रवाशांच्या खिशाला पडणारी चाट लक्षात घेत युवा नेते नितेश राणे अध्यक्ष असलेल्या ‘स्वाभिमान’ संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे.

‘स्वाभिमान’कडून येत्या २४, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी आठ तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसेस मुंबईतून सिंधुदुर्गसाठी सोडण्यात येणार आहेत. परतीच्या प्रवासासह अवघ्या शंभर रुपयांमध्ये या बसमधून सिंधुदुर्गवासियांना प्रवास करता येणार आहे. यासाठी सोमवार, २१ जुलैपासून ‘स्वाभिमान’च्या मुख्य कार्यालयात तिकिटांसाठी नोंदणी आणि विक्री सुरू केली जाणार आहे.

गणेश चतुर्थीनिमित्त एकाच दिवसांत रेल्वेची तिकिटे हाउसफुल झाल्यानंतर कोकण मार्गावर अतिरिक्त गाडय़ा सोडण्याची घोषणा रेल्वेने केली. परंतु, या जादा गाडय़ांही हाउसफुल झाल्याने मिळेल त्या गाडीने गणेशोत्सवात जायची तयारी कोकणवासियांनी केली आहे. मात्र, खासगी बसवाल्यांकडून सातशे-आठशे किंवा त्याहूनही जास्त रक्कम तिकिटांसाठी आकारली जात आहे.

त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांमधील प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन त्यांना अवघ्या शंभर रुपयांत मुंबईहून सिंधुदुर्गच्या प्रवासासाठी खासगी बसची सेवा पुरवण्याचा निर्णय स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी केला. त्यानुसार, २४ ते २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील विविध ठिकाणांहून प्रत्येकी ८ बस तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बस सोडण्यात येतील, अशी घोषणा नितेश राणे यांनी केली होती.

सोमवार, २१ जुलैपासून सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत या बससाठी तिकीट नोंदणी आणि तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. अवघ्या १०० रुपयांमध्ये गावचा परतीचा प्रवास करता येणार आहे. सध्या बसेसची संख्या निश्चित असली तरी प्रवाशांच्या मागणीनुसार बसच्या संख्येत वाढ केली जाईल, अशी माहिती स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी दिली.

नोंदणी व तिकिटांसाठी संपर्क स्वाभिमान संघटना, मुख्य कार्यालय,
एस. व्ही. रोड, मुव्ही टाइम सबर्बिया सिनेमाजवळ,
१ डेक्कन, वांद्रे पश्चिम (वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

2 COMMENTS

  1. साहेब मला गणपतीसाठी गावी जायचं आहे त्यामुळे मला टीकेत मिळावी हि नम्र vinanti

  2. THANK YOU नितेश राणे साहेब . तुम्ही आमचा प्रवास खूप सोपा आणि टेण्षीओण फ्री करीत आहात. परंतु तुम्ही अटी किवा कोणते PAPERS लागतील TE सांगितले नाही. मला ४ TICKETS लागतील त्या मिळतील का ?

    विजय मेस्त्री ९९२०३६४५८९ (विरार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version