Home महाराष्ट्र कोकण पर्यटकाचा किल्ले रायगडच्या दरीत कोसळून मृत्यू

पर्यटकाचा किल्ले रायगडच्या दरीत कोसळून मृत्यू

0

किल्ले रायगडाच्या पाय-या उतरताना तोल जाऊन पुन्हा एकदा एका पर्यटकाचा मृत्यू होण्याची घटना रविवार सायंकाळी घडली आहे. 
महाड – किल्ले रायगडाच्या पाय-या उतरताना तोल जाऊन पुन्हा एकदा एका पर्यटकाचा मृत्यू होण्याची घटना रविवार सायंकाळी घडली आहे. पावसाळ्यातील वातावरण आकर्षित करणारे असले तरी दाट धुक्यात हरवलेली वाट आणि शेवाळाने गुळगुळीत झालेल्या पाय-या धोकादायक बनल्या आहेत.

रविवारी रायगडावर मुंबई येथून काही पर्यटक फिरावयास आले होते. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास रायगड उतरत असताना परशुराम नाथा कामथे (३५) रा. कांजुरमार्ग, मुंबई यांचा खुबलढा बुरुजाजवळ एका धोकादायक ठिकाणी कामथे यांचा पाय घसरला आणि ते खोल दरीत कोसळले. मागून येणा-या त्यांच्या सहका-यांना ही बाब समोरून येणा-या पर्यटकाने सांगितली.

त्यानंतर शोध घेतला असता चित्त दरवाजाजवळील शिरकाई मंदिरासमोर डोंगरउतारावर कामथे यांचा मृतदेह सापडला. ही घटना महाड तालुका पोलिस ठाण्याला समजताच पोलिस उपनिरीक्षक उगळे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह काढण्यात आला. पुढील कारवाईसाठी मृतदेह महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version