Home टॉप स्टोरी ‘अदानी-अंबानीराज’ची चाहूल -मुख्यमंत्री

‘अदानी-अंबानीराज’ची चाहूल -मुख्यमंत्री

2

मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे नियोजन बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर सरकारच्या भागीदारीतून केले. 

मुंबई- मुंबईतील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मुंबईत मेट्रो प्रकल्पाचे नियोजन बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर सरकारच्या भागीदारीतून केले. त्या वेळी मेट्रोचे भाडे किती असावे, हे ठरलेले होते. मात्र आता रिलायन्स कंपनी भाडे वाढवून मागत आहे. या कंपनीला भाडेवाढ देण्यासाठीच काही लोक मेट्रोच्या उद्घाटनाचा उतावळेपणा करीत असल्याचा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला.

मेट्रो आली 

मुंबई मेट्रोचे रविवारी सकाळी उद्घाटन होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत त्यांनी मेट्रोच्या भाडेवाढीसाठी होत असलेल्या कारस्थानावर टीका केली.

[poll id=”675″]

न्यायालयातून निर्णय येण्याच्या आधीच काही लोकांना रिलायन्सला भाडेवाढ देण्याची घाई झाली आहे. त्यासाठीच सर्व आटापिटा सुरू असल्याचे दिसत आहे. आम्ही निवडणुकीपूर्वी म्हटले होते की केंद्रात मोदींचे सरकार येणे म्हणजे अंबानी आणि अदानीचे सरकार येण्यासारखे आहे, त्याची ही झलक आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. मेट्रोच्या भाडेवाढीचा निर्णय प्रलंबित असताना भाजपचे खासदार किरीट सोमय्या आणि आमदार प्रकाश मेहता उद्घाटनाची घाई करत आहेत, असे सांगत, ही केवळ सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

उद्घाटन कोणाच्या हस्ते?

मेट्रोचे भाडे करारात ठरल्याप्रमाणे राहिले तरच आपण त्या उद्घाटनाला उपस्थित राहू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. श्रेय घेण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी हा प्रकल्प कोणी आणला हे जनतेला माहीत आहे, असेही ते म्हणाले.

२००६ मध्ये सरकारच्या भागीदारीतून मुंबई मेट्रोचे नियोजन करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २३५६ कोटी ठरली होती. त्याच वेळी मेट्रो पूर्ण झाल्यानंतर याचे भाडे किती असेल हे निश्चित करण्यात आले होते. पहिल्या तीन किमी.साठी ९ रुपये, ३ ते ८ किमीसाठी ११ तर पुढील अंतरासाठी १३ रुपये भाडे त्यावेळी निश्चित करण्यात आले होते. मात्र हा प्रकल्प पूर्ण होण्यास वेळ लागल्यामुळे आता त्याची किंमत ४ हजार ३२१ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे भाडेवाढ द्यावी, असा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. त्यांनी सुचवलेले भाडे पहिल्या टप्यासाठी १० रुपये, दुस-या टप्प्यासाठी २० रुपये तर तिस-या टप्प्यासाठी ४० रुपये आहे. इतकी भाडेवाढ देण्यास सरकारचा विरोध आहे. १३ रुपयांचे भाडे थेट ४० रुपये देण्यास सरकारने विरोध केल्याने कंपनी न्यायालयात गेली आहे.

न्यायालयाचा निर्णय प्रलंबित असतानाच रविवारी उद्घाटन करावे, असे कंपनीचे निमंत्रण आले आहे. मी कंपनीला स्पष्ट शब्दात बजावले आहे की, जर करारामध्ये ठरल्याप्रमाणे ९, ११ आणि १३ या दराने भाडे आकारणार असाल तरच मी उद्घाटनाला येईन. त्यांनी माझी अट मान्य केली तरच आपण उद्घाटनाला जाऊ असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

2 COMMENTS

  1. मिश्रा,पांडे,गुप्ता,यादव,खान बाबा यांना मतासाठी कॉंग्रेसच मोठे केले आज सर्व नोकऱ्या वर त्यांची हुकुमत ,रेलायंचा सिएओ मिश्रा त्यापैकीच एक ! आम्ही आयुष्य भर बेकार राहून तुमस मत दिले !आम्हाला काय मिळाली तर बेकारी ! आज आमचे वय ४० शीत गेले नोकरीची वाट बघून !आयुष्भर प्रयत्न केले ,तुमी काही तरी कराल असे वाटले होते पण तुम्ही तुमच्याच कुटुंब सांभाळीत आहात !केवा तरी आमचा चुलीवर येउन पहा काय शिजते ते !

  2. सत्तेत कोणीही येउदे B.J.P.कॉंग्रेस शिवसेना माणसे कोणालाही गरीबाची फिकीर नाही त्यांना फक्त सत्ता उपभोगाची आहे त्यामुळे गरीब जगाला तरी राजकारण आणि गरीब मेल तरी राजकारण त्यांना काहीही फरक पडत नाही गरीबांपासून माताडांचा अधिकार कडून गया म्हणजे किमान गरीब राज्यकर्त्याचा भूल थापणा बळी पडणार नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version