Home विज्ञान तंत्रज्ञान मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनचा नवा पर्याय ‘टेलिग्राम’

मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनचा नवा पर्याय ‘टेलिग्राम’

2

‘वॉट्सअ‍ॅप’ ला टक्कर देण्यासाठी ‘टेलिग्राम’ नावाचे सुपरफास्ट इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये दाखल झाले आहे. 

मुंबई – सध्या स्मार्टफोनमध्ये इंस्टंट मेसेजिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मेसेजिंगच्या अ‍ॅप्लिकेशनमधील मोठा भिडू म्हणून वॉट्सअ‍ॅप’ ला समजले जाते. इंस्टंट मेसेजिंगच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये ‘वॉट्सअ‍ॅप’ करोडो लोकांच्या मनावर अधिराज्य  करत आहे. 

आता याच ‘वॉट्सअ‍ॅप’ ला जोरदार टक्कर देण्यासाठी ‘टेलिग्राम’ नावाचे सुपरफास्ट इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये दाखल झाले आहे. अँड्रॉईड सोबतच आयफोनवरही हे अ‍ॅप दाखल झाले आहे. इतर मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनपेक्षाही अधिक जलद मेसेजिंगची सुविधा, २०० लोकांचा ग्रुपची क्षमता, एक जीबी स्टोरेज फाईल्स पाठवण्याची सुविधा, वर्ड आणि पॉवरपॉईंटद्वारा मेसेजेस पाठवण्याची सोय हे सर्व पर्याय या नव्या ‘टेलिग्राम’ अ‍ॅप्लिकेशनमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये फेसबुकसारखा लॉग इन आणि लॉग आऊटचाही पर्याय देण्यात आला आहे.

याआधी मंगळवारी इन्स्टंट मेसेजिंगमधील ‘वॉट्सअ‍ॅप’च्या घोडदौडीला रोखण्यासाठी आफ्रिकेतील सर्वात मोठी मेसेंजिंग सेवा पुरवठादार मिक्सिटने भारतात एंट्री घेतली होती. त्यामुळे आता खरी स्पर्धा या तीन स्पर्धकांमध्ये रंगणार आहे. २००९ मध्ये स्मार्टफोनवर आगमन झालेल्या वॉट्सअ‍ॅपने अल्पावधीतच अनेक लोकांची पसंती मिळवली. सद्यस्थितीत दर महिन्याला व्हॅट्स अ‍ॅपसारख्या मेसेजिंगचा वापर करणा-या अ‍ॅक्टिव्ह युजर्सची संख्या ३५० दशलक्षांवर आहे.

कसे डाऊन लो़ड कराल ‘टेलिग्राम’ अ‍ॅप्लिकेशन

खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही हे अ‍ॅप्लिकेशन डाऊन लोड करु शकता
https://play.google.com/store/apps/details?id=org.telegram.messenger

आय़फोन साठी लिंक
https://appsto.re/in/psm60.i

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version