Home महामुंबई मोफत घरांच्या मागणीसाठी कामगारांची वर्षा बंगल्यावर धडक

मोफत घरांच्या मागणीसाठी कामगारांची वर्षा बंगल्यावर धडक

3

गिरणी कामगारांच्या हतबलतेचा फायदा एकीकडे दलालवर्ग घेत असताना दुसरीकडे राज्य शासनानेही कामगारांना लुबाडण्याचे ठरवले आहे. 

मुंबई- गिरणी कामगारांच्या हतबलतेचा फायदा एकीकडे दलालवर्ग घेत असताना दुसरीकडे राज्य शासनानेही कामगारांना लुबाडण्याचे ठरवले आहे. म्हाडाच्या घरांची किंमत ९ लाख ५० हजार जाहीर केली गेली.

काही कामगार संघटनांसोबत मुख्यमंत्री ही किंमत कशी ठरवू शकतात, तसेच कामगारांच्या अर्जामध्ये खंडीभर चुका आहेत, अशा परिस्थितीत सोडत कशी काय जाहीर केली जाऊ शकते? असा सवाल करत कामगार वर्षा बंगल्यावर धडकणार आहेत. ‘गिरणी कामगार एकजूट’ संघटनेतर्फे ४ मे रोजी दुपारी ३ वाजता मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार आहे.

१ लाख ४८ हजार कामगारांना घर मिळावे, यासाठी शासनाने ठोस धोरण बनवायला हवे. घरांच्या ताबा प्रक्रियेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पात्र कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना विशिष्ट पात्रता कार्ड द्यायला हवे.

आगामी सोडत अर्जाची, कागदपत्रांची पूर्ण छाननी केल्यानंतरच काढावी, असे ‘गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी’ संघाच्या चेतना राऊत यांनी सांगितले. एकाच कामगाराला दोन घरे लागणे, एका गिरणीतील कामगाराला दुस-याच गिरणीच्या जागी घर लागणे, घरे दलालांच्या घशात जाणे असे गैरप्रकार पहिल्या सोडतीत घडले आहेत.

हे लक्षात घेता आगामी सोडतीचे नियोजन करायला हवे, अशी कामगारांची मागणी आहे. कामगारांच्या घरांची किंमत गिरणी मालक आणि विकासकांकडून वसूल करून घ्यावी, ही आमची सुरुवातीपासूनची मागणी असून आम्ही त्यावर ठाम आहोत.

मुख्यमंत्र्यांनी ही मागणी धुडकावून लावल्याने त्यांच्या निषेधार्थ ४ मे रोजी मोर्चा काढला जाणार असल्याने कामगार नेत्यांनी सांगितले. कामगारांच्या घरांबाबत निर्णय घेताना किमान सर्व कामगार संघटनांना बोलवणे अपेक्षित होते, असा संताप कामगारांनी व्यक्त केला.

अद्याप २०१२च्या पहिल्या सोडतीतील घरांचे वितरण पूर्ण झाले नाही. एकाच कामगाराने दोन अर्ज भरले आहेत. मिल क्रमांक चुकीचे टाकण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत सोडत काढण्यासाठी घाई का, असा सवालही कामगारांनी केला.

3 COMMENTS

  1. सगळ्या संघटनांनी आपल्या सोबत असलेल्या सर्व कामगार यांना विचरावे कि घर पाहिजे कि पैसे कारण सर्व जन मोर्चा आंदोलन करून थकले आहेत त्या पेक्षा कामगाराना पैसे दिले तर ते कुटे तरी घर घेतील कारण किती दिवस मोर्चा आणि आंदोलन करणार कोणाच हि सरकार येउदे काही होणार नाही आसाच कामगारान जुळत ठेवणार आहेत त्या पेक्षा सर्व कामगार बंदुनी विचार करावा हे आपले नेते आणि राजकारणी एक आहेत काही होणार नाही

  2. किती मोर्चे काढणार, आंदोलने करणार.. आणि नेते फक्त आश्वासन देणार. घरे कधी बांधणार आणि देणार.. त्यापेक्षा सर्वांना पैसे द्या.. १०० टक्का घर घेतील..

  3. सर्व कामगार बंधूनी विचार करावा कोणाच हि सरकार असुदे काही होणार नाही हे लोक एक एक वर्ष कडत जाणार आणि ह्या जमनी गिरणी मालक आणि सरकार विकून आपले किशे भरणार आणि कामगार अशेच मोर्चे, आंदोलन करत राहणार, आपल्या सर्व कामगार बंधूनी विचार करावा आणि एकजुटीने पैसे ची मागणी करावी

    जय हिंद जय महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version