Home महाराष्ट्र कोकण मेवा श्री स्वामींना काय द्यावे, कसे द्यावे

श्री स्वामींना काय द्यावे, कसे द्यावे

1

प्रत्येकाला वाटते मी स्वामींचे नामस्मरण करतो, भक्ती करतो, माझे काम व्हावे. पण व्हावे असे वाटत असेल तर नि:स्वार्थ भक्ती लागते. काही भक्त स्वामींना नवस करतात. पण काम झाल्यानंतर त्या नवसाचे स्मरण अथवा विस्मरण होते, पण ‘‘हम गया नही जिंदा है’’ असे स्वामी सांगून गेलेत त्यांचे लक्ष भक्ताच्या बोलण्याकडे असतेच! 

माझ्या आयुष्यात मुलगा हरवला, मुलगी हरवली, गाय हरवली, म्हैस हरविली, सोने हरवले अशा ब-याच गोष्टी अनुभवल्या. पण माझे काम फक्त मार्गदर्शनाचे. पुढे तुम्ही आणि स्वामी. आमचे काम फक्त स्वामीकृपेने मार्गदर्शनाचे. बरेच भक्त नवसाचे शब्द पाळतात. काही बघू बघू असे म्हणतात. बरेच जण आमचे काम झाल्यास अक्कलकोट येथे दर्शनास येऊ असे म्हणतात, पण प्रत्यक्ष वेळ जवळ आल्यास, आपल्याच गावातल्या मंदिरात जाऊन स्वत:ला धन्य मानतात. त्यांच्यासाठी मी सांगेन, तुम्ही काय बोललांत, माझे काम होऊ द्या अक्कलकोट येथे येईन, कामे झालीत पण अक्कलकोटला जायला वेळ नाही. म्हणून गावातल्या मंदिरात गेले.

काही न करण्यापेक्षा हे नक्की चांगले, मग गावातल्या मंदिरापेक्षा स्वत:च्या हृदयातील स्वामी मंदिरात जावे! असो. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण स्वामी बघा कसे लक्ष ठेवतात. एकशे चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यात बोरमणी नावाचे गृहस्थ राहात होते.

गृहस्थ वाणी समाजातले पण त्यांच्या ब-याच गाई-म्हशी होत्या. एके दिवशी तीन म्हशी चुकून नाहीशा झाल्या. त्यांनी श्री स्वामींना नवस केला की, ‘‘जर माझ्या म्हशी सापडल्या, तर त्यातील एक म्हैस श्रीचरणी अर्पण करीन किंवा म्हशीची किंमत अर्पण करीन.’’ चार-पाच दिवसांनी म्हशी मिळाल्या.

सर्वाना आश्चर्य वाटले. गणपत रावांनी एका म्हशीच्या किमतीच्या दोन समया आणल्या आणि स्वामींचे भक्त चोळप्पा यांच्या जवळ दिल्या. परंतु एक म्हैस श्री स्वामींना अर्पण करीन या वाक्याचे त्यांना वारंवार स्मरण होऊन अस्वस्थ वाटत असे. त्यांनी वांझ म्हैस आणली (जी दूध देत नाही, जिला बाळ होत नाही अशी म्हैस) श्री स्वामींना अर्पण केली. स्वामी अंतज्र्ञानी होते त्यांनी ओळखले गणपतराव मला फसवत आहे.

स्वामी म्हणाले, ‘‘आमची म्हैस तुमच्या जवळच राहू द्या’’ श्री स्वामींना त्या मुक्या जीवाची (म्हशीची) दया आली, तिच्यावर कृपा केली तेव्हापासून म्हैस दूध देऊ लागली. गणपतरावांना खूप आनंद झाला. श्री समर्थाना अर्पण केलेली वांझ म्हैस दूध देऊ लागली. इकडे श्री स्वामींनी गणपतरावांची वाट पाहिली. पण त्यांना वेळ मिळाला नाही, अथवा विस्मरण झाले. हे समर्थाना सांगावे अशी त्यांना बुद्धी सुद्धा झाली नाही.

नैवेद्यासाठी त्यांनी थेंबभर सुद्धा दूध अक्कलकोट येथे पाठविले नाही. येथे गरज सरो आणि वैद्य मरो असा अनुभव स्वामींनी सर्वाना बोलून दाखविला. सत्या-असत्याचा विचार किंवा आपला अपराध याची जाणीव प्रपंच करणारे ठेवत नाही. पण स्वामींना आम्ही आई मानतो. ती भक्तांच्या बाबतीत शक्यतो विष्ठुर होत नाही, आई शक्यतो विषमता दाखवीत नाही. पण आपल्या बोलण्याचे फळ सर्वानाच मिळते.

कालांतराने ती म्हैस (काही दिवसांनी) मरण पावली. अशी श्रींची अगाध लीला होती. (संदर्भ-पुस्तक श्री स्वामी समर्थ, संपादक – रामचंद्र चिंतामण ढेरे- पृष्ठ- २७४-२७५) वरील प्रकरणांत हरविलेली म्हैस हे फक्त निमित्त आहे. श्री स्वामींच्या भक्तीमध्ये किती प्रामाणिक आहात याची परीक्षा श्री स्वामी घेतात.

श्री स्वामींच्या भक्तीचे निमित्त पण येणा-या श्री स्वामी भक्तांना तुम्ही कशी वागणूक देतात, यावर सुद्धा स्वामींचे लक्ष असते. अशा वृत्ती बळावतात, म्हणजेच श्री स्वामी भक्तीचे विस्मरण.

यत्र नार्यस्तु पुज्यंते तत्र रमयंती देवा:।।

श्री स्वामींच्या दरबारांतील सुंदराबाई, काकूबाई ही व्यक्तिमत्त्वे म्हणजे स्वामी भक्तीमधील फार मोठी उदाहरणे आहेत. त्यांचा जास्तीत सन्मान करण्याचा प्रयत्न स्वामींनी केला आहे. जेथे सहन होत नाही तेथेच स्वामींनी ‘अजूनही सुधार’ असे वाक्य उच्चारले आहे. थोडक्यांत स्वामी भक्ती करता करता स्वामींचे, स्वामींच्या कार्याचे आपणा सर्वाना विस्मरण होऊ नये हाच बोध येथे आहे.

एकदा एक आजी तेलाची बाटली घेऊन श्री स्वामी समर्थ मंदिरात आल्या. तेलाची बाटली देताना म्हणाल्या, ‘घरात भाजी, वस्तू कुजण्याचा, खराब होण्याचा खूपच अनुभव येतो’ असे का होते ते कळत नाही. मी क्षणभर शांत बसलो, कुजलेल्या उंदराचा वास मला कोठेतरी येऊ लागला.

मी त्यांना म्हणाले, ‘या बाटलीत छोटासा उंदीर पडला होता का? घरांत उंदीर आहेत का? हे तेल कसले आहे? तिळाचे आहे, पामतेल आहे, राईचे आहे की कमी पैशांत मिळाले म्हणून आणले आहे. जसे तुम्ही स्वामींना द्याल तसेच आपल्याला मिळते. तिळाचे तेल ७० टक्के प्राणवायू निर्माण करते आणि ३० टक्के कार्बन निर्माण करते.

पण साजूक तूप १०० टक्के प्राणवायू म्हणजे १०० टक्के पैसा, तुमच्या डोक्यावर कोणाचेच कर्ज नाही. ७० प्राणवायू म्हणजे ७० टक्के कॅश (पैसा) आणि तीस टक्के कर्ज. मुंबई येथे मुंबादेवी मंदिरात कधीही जा खूपच लांब रांग सकाळपासून असते, कारण तिथे चोवीस तास साजूक तुपाचा दिवा लावला जातो. त्याच्या चांगल्या लहरी सर्वत्र निर्माण होतात. तसेच सत्यनारायणाचे सुद्धा मंदिर आहे.

भारतामधील प्रत्येक राज्याच्या राजधानीमधून लोक मुंबादेवीच्या दर्शनास येतात. माझे बोलणे झाल्यावर आजीबाईंच्या डोळ्यांत पाणी आले. सदर तेलाची बाटली घेऊन त्या निघून गेल्या. म्हणूनच स्वामींना काय द्यायचे असेल तर चांगले द्या, अन्यथा देऊ नका. कारण ते आपल्याकडे काहीच मागत नाहीत. निदान तुमचे मन द्या, मग स्वामी मन आणि मान यांचा समन्वय साधतात.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version