Home टॉप स्टोरी रोमिंग कॉल, एसएमएस स्वस्त होणार

रोमिंग कॉल, एसएमएस स्वस्त होणार

1

भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने एक मेपासून रोमिंगच्या कमाल दरांमध्ये कपात केल्याने रोमिंग कॉल आणि एसएमएस स्वस्त होणार आहेत.


नवी दिल्ली- भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने एक मेपासून रोमिंगच्या कमाल दरांमध्ये कपात केल्याने रोमिंग कॉल आणि एसएमएस स्वस्त होणार आहेत. यामध्ये कॉल २३ टक्क्यांपर्यंत, तर एसएमएसचा दर ७५ टक्क्यांपर्यंत कमी होईल. यामुळे रोमिंग कॉल आणि एसएमएससंबंधी असलेल्या कंपन्यांच्या सध्याचे प्लॅन मोडीत निघणार आहेत.

ट्रायने राष्ट्रीय स्तरावरील रोमिंगच्या दराच्या कमाल मर्यादेत कपात केली आहे. यामुळे दूरसंपर्क कंपन्यांना त्यानुसार विशेष रोमिंग टॅरिफ प्लॅन तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सुधारित दर एक मे २०१५पासून लागू होतील, असे ट्रायने स्पष्ट केले आहे.

रोमिंगचा कमाल दर प्रति मिनिट १.५ रुपयावरून १.१५ रुपये करण्यात आला. तर नॅशनल एसएमएसचा दर १.५ प्रति एसएमएसवरून ३८ पैसे प्रति एसएमएस करण्यात आला आहे.

याबरोबरच देशपातळीवरील रोमिंगमध्ये असताना लोकल एसएमएस एक रुपयांवरून २५ पैशापर्यंत, तर लोकल कॉल प्रति मिनिट कमाल ८० पैसे निश्चित करण्यात आला आहे. तर रोमिंगमध्ये असताना इनकमिंग कॉल ४५ पैशांवर आले आहेत. याआधी हा दर ७५ पैसे प्रति मिनिट होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version