Home Uncategorized क्रिकेट विश्वचषक २०१५ मोहम्मद शामीची डोपिंग चाचणी

मोहम्मद शामीची डोपिंग चाचणी

2

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीची शुक्रवारी ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) उत्तेजक द्रव सेवन चाचणी (डोपिंग टेस्ट) करण्यात आली.
नवी दिल्ली- आपल्या वेगवान गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक फलंदाजांना माघारी धाडणारा भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शामीची शुक्रवारी ऑस्ट्रेलियात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) उत्तेजक द्रव सेवन चाचणी (डोपिंग टेस्ट) करण्यात आली.

जागतिक उत्तेजक द्रव सेवन विरोधी संस्थेने (वाडा) जुलै २००६ मध्ये जगातील प्रत्येक खेळाडूची डोपिंग चाचणी होणे बंधनकारक केल्याने आयसीसीकडून क्रिकेटपटूंची चाचणी घेण्यात येत आहे. यामुळे उत्तेजक आणि अमली द्रव सेवनावर आळा घालण्यास मदत होईल आणि क्रिकेट हा खेळ उत्तेजक द्रव्यांपासून अलिप्त राहील, असे आयसीसीने म्हटले आहे. शामीच्या चाचणीचा अहवाल लवकरच मिळेल.

यापूर्वी २००३ मध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेर्न वॉर्न डोपिंग चाचणीत दोषी आढळला होता. तर २००७ च्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचे शोएब अख्तर आणि मोहम्मद असिफ हे दोन खेळाडू दोषी आढळले.

विश्वकरंडक स्पर्धेत १५ फेब्रुवारीला झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शामीने (९ षटके, १ निर्धाव व ३५ धावा) पाकच्या चार फलंदाजांना बाद करुन विजयश्री खेचून आणली. आता भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे. या दोन्ही तुल्यबळ संघांमध्ये महत्त्वाची लढत होणार असल्याने, आयसीसीने डोपिंग चाचणी केल्याचे समजते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version