Home विदेश रक्तपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा अमेरिकेला इशारा

रक्तपात घडवण्याचा दहशतवाद्यांचा अमेरिकेला इशारा

0

‘दहशतवाद्यांना लक्ष्य केल्यास अमेरिकेच्या जगभरातील नागरीकांना शोधून रक्तपात घडवू’, असा इशारा इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने दिला आहे.

बगदाद- इराकमध्ये मोठ्या प्रमाणावर इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने कब्जा केला आहे. या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेने या भागात हवाई हल्ले सुरु केले आहेत. या हल्ल्यामध्ये ‘दहशतवाद्यांना लक्ष्य केल्यास अमेरिकेच्या जगभरातील नागरीकांना शोधून रक्तपात घडवू’, असा इशारा इस्लामिक स्टेट ऑफ इराक या दहशतवादी संघटनेने दिला आहे.

दहशतवाद्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात शिरच्छेद केलेल्या एका अमेरिकन नागरिकाचे चित्रीकरण आहे. याद्वारे इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दहशतवाद्यांनी अमेरिकेला ‘आम्ही तुमचा रक्तपात घडवू’ असा इशारा दिला आहे.

दरम्यान, अमेरिकेची मदत मिळाल्यामुळे कुर्दिश योद्‌ध्यांनी इस्लामिक दहशतवाद्यांच्या ताब्यातील काही भाग सोडवण्यात यश मिळवले आहे. दहशतवाद्यांच्या भीतीने या भागामधील हजारो याझीदी आणि ख्रिश्‍चन नागरिकांना घरदार सोडून पलायन करावे लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version