Home टॉप स्टोरी वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराला चाप लावणार

वाहतूक विभागातील भ्रष्टाचाराला चाप लावणार

1

वाहतूक विभागातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

नवी दिल्ली– देशातील वाहतूक विभागाच्या कार्यालयातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार मोटार वाहन सुधारणा विधेयक संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती मंगळवारी रस्ते, महामार्ग आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अमेरिका, कॅनडा, सिंगापूर, जपान, जर्मनी आणि इंग्लंडच्या वाहन कायद्याचा अभ्यास करून हे विधेयक बनवले आहे. या विधेयकामुळे वाहतूक खात्यातील भ्रष्टाचार पूर्णपणे थांबेल, अशी माहिती त्यांनी दिली. भारतीय रस्ते कॉँग्रेसच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

सध्याची वाहतूक पोलिस ही संकल्पना कालबाह्य झाली आहे, असे सांगून गडकरी म्हणाले की, सर्व प्रकारची वाहतूक परमीट ऑनलाइन देण्यात येतील. तसेच वाहतुकीचे नियम मोडल्यास दंड ठोठावण्यात येईल. त्याचबरोबरच प्रत्येक वाहन परवान्याचे रेकार्ड ठेवले जाईल. इ-गव्हर्नन्स कार्यक्रमासाठी ही सर्व माहिती वापरली जाईल.

वाहनाचे डिझाइन बनवताना आंतरराष्ट्रीय निकष, प्रदूषण नियंत्रण तयार करण्यात आले आहे. हे बनवताना प्रगत देशातील कायद्यांचा आधार घेतला आहे, असेही ते म्हणाले.

देशातील महामार्ग क्षेत्र सध्या अडचणीतून जात आहे. ५१ पैकी २१ प्रकल्पांसाठी कोणीही निविदाकार पुढे येत नाही. भूसंपादन न झाल्याने आणि पर्यावरणाच्या कायद्यात ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प पडून आहेत. जुलैमध्ये देशात एकही किलोमीटर रस्त्याचे बांधकाम झाले नाही. येत्या दोन वर्षात दरदिवशी ३० किलोमीटर रस्ते बांधणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

1 COMMENT

  1. अहो कसला भ्रष्टाचार तुम्ही थांबवणार आहात ?? त्या पेक्षा भारत देशाचे नावच बदलून ” भ्रष्टाचार देश ” अस ठेवा ,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version