Home महाराष्ट्र राज्यात नागपंचमी उत्साहात साजरी

राज्यात नागपंचमी उत्साहात साजरी

0

राज्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सांगली- राज्यात नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्सवाचे गाव अशी बत्तीस शिराळा गावाची ख्याती आहे. या गावातील नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या आदेशानंतर खंडित झाली आहे. यामुळे नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे.

न्यायालयीन आदेशामुळे प्रत्यक्ष नागाची पूजा न करता केवळ नागाचे प्रतिमापूजन करून सण साजरा केल्याने महिला वर्गात काहीशी नाराजी पाहायला मिळाली. यादिवशी शिराळा येथील महिला एक दिवसाचा उपवास करतात. तसेच जिवंत नागाला भाऊ मानून, त्याची पूजा केली जाते. यानंतर गावातील तरुणमंडळी या नागदेवतेची मिरवणूक काढतात. मात्र, काही वर्षांपूर्वी प्राणीप्रेमी संघटनांच्या याचिकांवर सुनावणी करताना जिवंत नागाची पूजा व मिरवणुकीवर न्यायालयाने बंदी आणली.

यानंतर शिराळ्यामध्ये महिलांनी मातीच्या नागांची आणि प्रतिमांची पूजा करण्यास सुरूवात केली.

नागपंचमीनिमित्त दर्शन घेण्यासाठी आज दिवसभर शंकराच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. नागपंचमीनिमित्त नागाचे दर्शन घेतल्याने भाविकांना पुण्य प्राप्ती होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. नागपंचमीला महादेवाची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून आहे.

ग्रामिण भागात चिखलाचे वारुळ तयार करण्यात येते, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष वारुळाची पूजा महिला दूध व लाह्या देवून करतात.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version