Home विदेश अमेरिकेचा चीनवर अणूबॉम्ब हल्ला करण्याचा इशारा

अमेरिकेचा चीनवर अणूबॉम्ब हल्ला करण्याचा इशारा

1

अमेरिकेनेही चीनला धमकी दिल्याने चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन- काही दिवसांपुर्वी चीनने अमेरिकेला धमकी दिल्यानंतर अमेरिकेनेही चीनला धमकी दिल्याने चीन आणि अमेरिका या दोन देशांमधील वाद चिघळण्याची शक्यता आहे. चीनवर अणूबॉम्ब हल्ला करण्याची धमकी अमेरिकेचे कमांडर अॅडमिरल स्कॉट स्विफ्ट यांनी दिला.

ऑस्ट्रेलियाई नॅशनल युनिव्हर्सिटी सुरक्षा संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कमांडर स्विफ्ट यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिले तर पुढील आठवड्यातच चीनवर अणुबॉम्ब टाकू, असा इशारा दिला.

अमेरिकी लष्करातील प्रत्येक सैन्याला संविधानाचे देशातील तसेच विदेशातील शत्रूंपासून रक्षण करण्याची शपथ दिली जाते. तसेच अधिकारी आणि देशाच्या अध्यक्षांच्या आदेशांचे पालन करण्यासंबंधी सांगितले जाते. अमेरिकी संविधानाचे तेच मूलभूत तत्त्व आहे, असेही स्विफ्ट यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी दक्षिण आणि पूर्व सागरी क्षेत्रात चीन आणि अमेरिकेत तणाव वाढला आहे. त्यानंतर चीनने अमेरिकेला धमकी दिली होती. आता अमेरिकी कमांडरनेही चीनवर अणुबॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिल्याने या दोन देशातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version