Home महाराष्ट्र रानडुकराच्या फासकीत अडकून बिबटया जखमी

रानडुकराच्या फासकीत अडकून बिबटया जखमी

0

मळेवाड-परबवाडी येथील राणेवाडी प्रवेशद्वारानजीक आरोंदा-मळेवाड मुख्य रस्त्यालगतच्या झुडुपात रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या फासकीत शनिवारी बिबटया अडकला.
मळेवाड– मळेवाड-परबवाडी येथील राणेवाडी प्रवेशद्वारानजीक आरोंदा-मळेवाड मुख्य रस्त्यालगतच्या झुडुपात रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या फासकीत शनिवारी बिबटया अडकला. या फासकीतून सुटण्याचा प्रयत्न करीत असताना हा बिबटया जखमी झाला. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी वनविभागाला कल्पना दिली. या बिबटयाच्या पायाला जखम झाल्याने त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मळेवाड-आरोंदा रस्त्यालगत परिसरात फासकी लावून रानडुक्कर पकडण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच गावठी बॉम्बच्या सहाय्यानेही डुक्कर पकडले जातात. काही वेळा पाळीव प्राणीही या बॉम्बच्या स्फोटात जखमी झाले आहेत. मळेवाड येथे खाणकामासाठी बहुतांश जंगल परिसर नष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे हे वन्यप्राणी मानवी वस्तीच्या दिशेने येत आहेत. 

मळेवाड-परबवाडी येथील राणेवाडी प्रवेशद्वारानजीक आरोंदा – मळेवाड मुख्य रस्त्यालगतच्या झुडुपात रानडुक्कर पकडण्यासाठी कुणीतरी फासकी लावली होती. वस्तीच्या दिशेने येत असलेल्या बिबटयाचा पाय या फासकीत अडकल्याने तो जखमी झाला. सकाळी ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला याबाबतची कल्पना दिली. त्यानंतर वनपाल या ठिकाणी दाखल झाले. आरोंदा पोलिस दूरक्षेत्रातही याबाबत माहिती देण्यात आली. फासकीत अडकलेल्या बिबटयाला वनविभागाच्या अधिका-यांनी पिंजरा लावून पकडले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version