Home टॉप स्टोरी राष्ट्रवादीला केंद्रातील सत्तेचे फायदे हवेत

राष्ट्रवादीला केंद्रातील सत्तेचे फायदे हवेत

1

मागणी पूर्ण होत नसल्यास आमच्याशी चर्चाच करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. तसेच केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर तेथे आपल्याला काही मिळते का? हा विचारही आघाडी तोडण्यामागे असू शकतो, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मुंबई- राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून १४४ जागा आणि मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्यात आली आली होती. ही मागणी पूर्ण होत नसल्यास आमच्याशी चर्चाच करू नका, अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती. तसेच केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर तेथे आपल्याला काही मिळते का? हा विचारही आघाडी तोडण्यामागे असू शकतो, असा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. राष्ट्रवादी कॉँग्रेसने आघाडी सरकारमधून बाहेर पडल्याची घोषणा केल्यानंतर रात्री उशीरा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

भाजपने युतीतून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादीने आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा योगायोग समजावा का, असे विचारत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला. तसेच केंद्रातील सत्ताबदलानंतर सरकारचे फायदे घेण्यासाठी आणि राज्यहितापेक्षा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीने आघाडी मोडली असल्याचा ठपका मुख्यमंत्र्यांनी ठेवला. राज्यात कॉँग्रेसचेच पूर्ण बहुमतातील सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजवादी पक्ष आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीशी आघाडी करून निवडणूक लढवणार आहोत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

कॉँग्रेसने गेल्या १५ वर्षात विकासाची कामे मोठय़ा प्रमाणावर कामे केली आहेत. राज्याला प्रगतीपथावर नेले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसला केवळ केंद्रातील सत्तेचे फायदे होते. आपला बचाव करण्यासाठी आणि केंद्रातील सत्तेचे फायदे घेण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी कॉँग्रेस करत आहेत. आपल्या मूळ विचारधारेशी विरोधात जाऊन ते प्रयत्न करत आहेत का? असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला.

> ‘राष्ट्रवादीने राज्य हितापेक्षा वैयक्तिक हित महत्त्वाचे मानले’
> १४४ जागांची मागणी मान्य होणे अशक्य होते
> युती तुटल्यानंतर तासाभरातच आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय हा विलक्षण योगायोग

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version