Home क्रीडा रिव्हर्स स्विंग रिव्हर्स स्विंग – १९ सप्टेंबर २०१३

रिव्हर्स स्विंग – १९ सप्टेंबर २०१३

0

जाणून घ्या क्रिकेटच्या मैदानावरील रंजक घडामो़डी

१९७७
भारताचा माजी कसोटीपटू आकाश चोप्राचा जन्म. त्याने १० कसोटीत ४३७ धावा फटकवल्या. आंतरराष्ट्रीयपेक्षा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.


१९८६
सर्दीचा त्रास होत असतानाही तब्बल साडेआठ तास फलंदाजी करून चेन्नई कसोटीत डीन जोन्स यांनी २१० धावांची बहारदार खेळी केली. भारतात द्विशतक झळकवणारे ऑस्ट्रेलियाचे पहिले फलंदाज ठरले. ३४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव ३४७ धावांवर संपल्याने सामना ‘टाय’ झाला. कसोटीतील हा केवळ दुसरा ‘टाय’ सामना होता.


१९९७
झिम्बाब्वेविरुद्धच्या हरारे कसोटीत न्यूझीलंडच्या स्टीफन फ्लेमिंगने एका डावात पाच झेल घेत ऑस्ट्रेलियाच्या विक रिचर्डसन (वि. दक्षिण आफ्रिका, १९३५-३६) यांच्या सर्वाधिक झेलची बरोबरी साधली. त्या कसोटीत फ्लेमिंगने आणखी दोन झेल घेत ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपेल यांच्या (वि. इंग्लंड, १९७४-७५) विक्रमाशी बरोबरी केली.


१९९८
सहारा कपमध्ये टोरँटोत शाहीद आफ्रिदीच्या (९४ चेंडूत १०९) फटकेबाजीच्या जोरावर पाकिस्तानने चौथी वनडे १३४ धावांनी जिंकत मालिका ३-१ अशी खिशात घातली. क्वालालंपूरमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा चार विकेट्सनी पराभव करत दक्षिण आफ्रिकेने राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिलेवहिले सुवर्णपदक पटकवले. त्यावेळी प्रथमच राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश होता.


२००२
जवागल श्रीनाथने ओव्हलवर लिस्टरशायरकडून खेळताना सरेविरुद्ध हॅटट्रिक घेतली. गंमत म्हणजे हॅटट्रिक घेतली, हे श्रीनाथला त्यावेळी कळलेच नव्हते. आधीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर आणि पुढील षटकातील पहिल्या दोन चेंडूंवर विकेट घेत हॅटट्रिक पूर्ण झाल्याने श्रीनाथच गोंधळला होता.


२००७
युवराजचे सहा षटकार आणि जलद अर्धशतक.. टी-२० वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताच्या युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सनंतर वनडेत अशी कामगिरी करणारा युवराज हा दुसरा क्रिकेटपटू ठरला. याच सामन्यात युवराजने १२ चेंडूत तडकवलेले अर्धशतक हा सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील जलद अर्धशतक आहे. मात्र षटकारांच्या विक्रमाने जलद अर्धशतकी खेळी झाकोळली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version