Home विज्ञान तंत्रज्ञान ‘रेडमी नोट’ सहा सेकंदात आऊट ऑफ स्टॉक

‘रेडमी नोट’ सहा सेकंदात आऊट ऑफ स्टॉक

0

श्योमीने मंगळवारी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर बहुप्रतिक्षित ‘रेडमी नोट’ची विक्री सुरु केली आणि केवळ सहा सेकंदात हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉकही झाला.

मुंबई -स्वस्त आणि मस्त अशा चीनी उत्पादक स्मार्टफोन्सची भारतीय बाजारातील मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. श्योमीच्या एमआय ३’ आणि ‘रेडमी १एस’ या स्मार्टफोन्सनंतर ‘रेडमी नोट’लाही भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे.

श्योमीने मंगळवारी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर ‘रेडमी नोट’ची विक्री सुरु केली आणि केवळ सहा सेकंदात हा स्मार्टफोन आउट ऑफ स्टॉकही झाला. कंपनीने ५० हजार स्मार्टफोनची किंमत ८,९९९ रुपये इतकी ठेवली होती.

Mi India: Redmi Note out of stock in 6 secs today! @Flipkart @MiIndiaOfficial , असे उपाध्यक्ष  ह्युगो बर्रा यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

रेडमी नोटमध्ये ५.५ इंचाचा डिस्प्ले असून यामध्ये १.७ गिगाहर्टझ मिडीयाटेक ओक्टाकोर प्रोसेसर आहे. तसेच आठ जीबीची इंटरनल मेमरी असून दोन जीबी रॅम आहे. १३ मेगापिक्सेलचा रेयर कॅमेरा देण्यात आला असून पाच मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये ४.२ जेलीबीन अँड्रॉईड आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version