Home देश रेल्वेच्या तात्काळ तिकीट दरांत वाढ

रेल्वेच्या तात्काळ तिकीट दरांत वाढ

1

ऐन सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीट दरांत वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशावर अधिकच ताण पडणार आहे.

नवी दिल्ली – ऐन सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीट दरांत वाढ झाल्याने प्रवाशांच्या खिशावर अधिकच ताण पडणार आहे. तात्काळ कोट्यामधील ५० टक्के तिकीटांची विक्री ही सामान्य तात्काळ तिकीट दरात उपलब्ध असून पुढील तिकीटांसाठी प्रवाशांना वाढीव पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती रेल्वेने दिली. जसजशी तिकीटे कमी होत जातील तसतशी तिकीटांची किंमत वाढत जाईल. ही ‘प्रिमिय तात्काळ तिकीट सुविधा’ एक ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे.

या सुविधेअंतर्गत तात्काळच्या एकूण तिकीटांपैकी पहिल्या ५० टक्के तिकीटांच्या आरक्षणासाठी सामान्य दर लागू असतील त्यानंतरच्या दहा टक्के तिकीटांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ होईल आणि उरलेल्या तिकीटांसाठी ही किंमत आणखी वाढत जाईल.

उदाहरणार्थ, एखाद्या ट्रेनच्या थर्ड एसी डब्यात ६० जागा उपलब्ध आहेत. तर त्यापैकी ३० जागांसाठीची तिकीटे ही सामान्य तात्काळ दराने विक्री केली जाईल. उरलेल्या ३० तिकिटांपैकी १० टक्के म्हणजे तीन तिकीटे ही २० टक्के वाढीव दराने प्रवाशांना दिली जातील. तर उरलेली २७ तिकीटांसाठी हे दर वाढत जातील. याआधी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रेल्वेने तात्काळ तिकीटांच्या दरात वाढ केली होती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version