Home शिकू आनंदे रोज वापरा काही संस्कृत शब्द

रोज वापरा काही संस्कृत शब्द

0

संस्कृत ऊर्फ गिर्वाणवाणी ही एक ऐतहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध, अभिजात आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. विख्यात व्याकरण तज्ज्ञ पाणिनीने इ. स. पूर्व काळात ‘अष्टध्यायी’ या ग्रंथाद्वारे संस्कृत भाषेला प्रमाणित केले.

संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. परंतु सध्या दैनंदिन व्यवहारात संस्कृत शब्दांचा वापर कमी झाला आहे याची बरीच कारणे आहेत. लोकांचा बदलता आहारविहार, विविध भाषा एकत्रित करून बोलणे, त्यामुळे कोणतीच भाषा लोक सलग बोलू शकत नाहीत. मराठी भाषाही बोलताना त्यामध्ये हिंदी तसेच इंग्रजी भाषा वापरली जाते. अशा वेळी संस्कृत कुठे तरी मागे पडते. शाळेत जर संस्कृत शिकवले जाते तर त्या भाषेचा किंवा त्या भाषेतील शब्दांचा वापर विद्यार्थी बोलताना का करत नाहीत? की त्यांना त्याचे शब्द ज्ञात नाहीत, असा विचार मनांत डोकावून जातो.

संस्कृत हा विषय खूप गुण मिळवून देणारा आहे आणि खरेच विद्यार्थी यात पैकीच्या पैकी गुण प्राप्त करतात. परंतु नंतर ती भाषा विसरून जातात. कारण त्यांना संस्कृत लिहिता येते, बोलण्याचा सराव होत नाही. विद्यार्थ्यांनी या विषयाकडे गुण मिळवून देणारा विषय म्हणून न पाहता संस्कृत विषयाच्या गोडीचा आस्वाद घ्यावा. संस्कृत भाषा दैनंदिन जीवनात आणावी असा प्रयत्न आपणही केला पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या जाणा-या शब्दांसाठी प्रतिशब्द शोधून काढायला हवेत, ते सोपे असायला पाहिजेत, ते लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. त्यातीलच काही आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थाची संस्कृत नावे पुढीलप्रमाणे आहेत.

अशाच प्रकारे फुले, फळे, प्राणी, भाज्या, उपयुक्तवस्तू, पक्षी अशी नावे जर आपण आपल्या बोलण्यात वापरली. तर संस्कृतमधील  काळानुरूप येणारे शब्द लोकांना माहीत होतील आणि त्याचा प्रसार आणि प्रचार होईल.

खाद्यनामानि..
आईस्क्रिम – पयोहिम
चॉकलेट – चाकलेह
केक – स्निग्धपिष्टकम
बिस्कीट – सुपिष्टकम
समोसा – समाश:
इडली – शाल्यपूप
डोसा- सोपसकरदोसा
वडापाव- वटिकारोटिका
भजी- वटिका
चिप्स – कासालू
पिज्झा – पिष्टजा
पाणीपुरी – जलपुरिका
सरबत – शितालपानीयम
सॅन्डविच – सम्पुटाश
बर्गर – शाकरोटिका
चिंगम – चर्वणकम

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version