Home मनोरंजन लय भारी रितेश!

लय भारी रितेश!

0

मराठी चित्रपटसृष्टीत रितेशने आधीच निर्माता म्हणून बस्तान बसवलंय. त्याच्या ‘बालकपालक’ या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. 

रितेश देशमुखसाठी सध्या सुवर्णकाळ आहे म्हणायचा! नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘एक व्हिलन’ने तिकीट खिडकीवर चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी; खलनायकाच्या भूमिकेत दिसलेल्या रितेशने नायकापेक्षाही जास्त प्रशंसा पदरात पाडून घेतलीय. या चित्रपटात कधी नव्हे तो रितेशचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. त्यात आता निर्माता म्हणून त्याचाच ‘लय भारी’ हा चित्रपटही नुकताच प्रदर्शित झालाय. ज्यात रितेश अॅक्शन हिरो आहे. या चित्रपटालाही भरभरून प्रसिद्धी मिळतेय.

मराठी चित्रपटसृष्टीत रितेशने आधीच निर्माता म्हणून बस्तान बसवलंय. त्याच्या ‘बालकपालक’ या चित्रपटाने चांगलं यश मिळवलं होतं. असो. पण आपल्या करिअरचा सुवर्णकळस गाठायला रितेशला चक्क ११ वर्षाचा कालावधी लागला आहे बरं का? २००३मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘तुझे मेरी कसम’ प्रदर्शित झाला होता. महाराष्ट्र वगळता संपूर्ण भारतात या चित्रपटाने सुमार कामगिरीच केली होती.

महाराष्ट्रात मात्र हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. काही ठिकाणी तर हा चित्रपट म्हणे २०-२० वेळा दाखवला गेला. आणि प्रत्येक वेळी त्याने चांगला गल्ला जमवला. यावर वावडय़ा उठल्या त्या अशा की, रितेश महाराष्ट्रातील एका मोठय़ा नेत्याचा मुलगा आहे. त्यामुळेच हा चित्रपट सफल झाला. अहो पण; राजकीय कार्यकर्ते जास्तीत जास्त एकदा किंवा दोनदाच चित्रपट पाहू शकतील. १० ते १२ वेळा तिकीट काढून चित्रपट पाहण्यासाठी हाडाचा सिनेप्रेमीच नको का? सामान्य लोकच जेव्हा चित्रपट यशस्वी करतात, तेव्हा अशा वावडय़ा उठवणा-यांच्या तोंडाला आपसूकच टाळं लागतं, बरं का रितेश! त्यांचं सोड; तू आपला असाच यशस्वी हो बाबा!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version