Home टॉप स्टोरी १०० रुपयांत गावाक चला!

१०० रुपयांत गावाक चला!

8

‘स्वाभिमान’कडून येत्या २४, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी आठ तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना फक्त शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. 

मुंबई – गणपतीसाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेचे तिकीट हाउसफुल्ल झाल्यामुळे खासगी बसगाडयांनीही तिकिटांच्या किमती अव्वाच्या सव्वा वाढवल्या आहेत. कोकणी माणसांची ही होणारी ससेहोलपट आणि लुटमार पाहून ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.

‘स्वाभिमान’कडून येत्या २४, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी आठ तर २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बसगाडय़ा सोडण्यात येणार आहेत. या प्रवासासाठी त्यांना फक्त शंभर रुपये मोजावे लागणार असून नोंदणी करणा-या प्रवाशांना त्याच तिकिटावर परतीच्याही प्रवासाची सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे आता ‘कोकणवासीयांका शंभर रुपयांत गावाक जाऊक गावतला.’

गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या तिकीट बारीवर अवघ्या काही मिनिटांमध्ये हाउसफुल्लचा बोर्ड लागल्यामुळे कोकणवासीयांसमोर खासगी बसगाडयांचा पर्याय उरला. मात्र देवगड, मालवण, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला आदी तालुक्यांमधील कोकणी जनतेला खासगी बस गाडयांच्या तिकिटांसाठी ६०० ते ८०० रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे जनतेची होणारी ही लुटमार लक्षात घेऊन त्यांना खासगी बसची सेवा पुरवण्याचा निर्णय स्वाभिमान संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष नितेश राणे यांनी घेतला आहे. गावी जाणा-यांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या खिशाला चाट लागू नये, म्हणून २४ ते २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ८ खासगी बस विविध ठिकाणांहून सोडल्या जातीत.

तर २७ आणि २८ ऑगस्टला गावी जाणा-यांसाठी प्रत्येकी २४ गाडय़ा सोडण्यात येतील, अशी घोषणा नितेश राणे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली. या वर्षीपासून ‘स्वाभिमान’कडून कोकणच्या जनतेसाठी हा कार्यक्रम हाती घेतला असून पुढील प्रत्येक गणेशचतुर्थीच्या सणाला कायमस्वरूपी कार्यक्रम केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बस गाडय़ांसाठी येत्या सोमवारी २१ जुलैपासून वांद्रे येथील ‘स्वाभिमान’च्या कार्यालयांमध्ये तिकीट नोंदणी आणि विक्री होणार आहे. केवळ १०० रुपयांमध्ये हे तिकीट उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तिकीट नोंदणी केल्यांनतर निश्चित केलेल्या दिवशी मुंबईतील विविध ठिकाणांसह ठाणे, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली आदी ठिकाणांहून या गाडय़ा सोडल्या जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सध्या काही गाडय़ा निश्चित केल्या असल्या तरी कोकणी माणसांची मागणी वाढल्यास त्यांना निराश न करता त्यांच्यासाठी आणखीन गाडय़ा सोडल्या जातील. परंतु कोकणवासीयांची कोणती गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेतली जाईल, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

कधीपासून आणि कुठे होणार तिकीट नोंदणी व विक्री
येत्या सोमवार दिनांक २१ जुलैपासून बसच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. तिकिटाच्या नोंदणीसाठी ‘स्वाभिमान’संघटना, १ डेक्कन, मुव्ही टाइम, सबर्बिया सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम),मुंबई ४०००५०, दूरध्वनी: ०२२- २६४२१४५२ या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन स्वाभिमान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांनी केले.

परतीचा प्रवासही मोफत
गणेश चतुर्थीला गावी जाणा-या कोकणवासीयांसाठी खासगी बस सोडण्यात आल्या असल्या तरी नोंदणी करताना संबंधितांना परतीचीही नोंदणी करता येईल. जाण्यासाठी नोंदणी करताना येण्याचीही नोंदणी केली तर त्यांच्याकडून येण्याचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जाण्यासाठी आकारल्या जाणा-या १०० रुपयांमध्ये येण्याचे तिकीट दिले जाईल. अर्थात जाताना नोंदणी करणा-यांनाच येताना त्याचा लाभ मिळेल. त्यांच्याकडून येताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

तिकीट विक्रीतील पैसा कोकणच्याच विकासासाठी
खासगी बसेच्या तिकीट विक्रीतून मिळणारा पैसा हा कोकणातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, तरुणांच्या स्वयंरोजगारासाठी तसेच कोकणातील विधायक कामांसाठी वापरला जाणार आहे. कोकणी जनतेकडून घेतले जाणारे शंभर रुपये हेसुद्धा कोकणातील जनतेसाठीच कामी आणले जाणार आहे.

या दिवशी सुटणार बस

२४, २५ आणि २६ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ८ बस २७ आणि २८ ऑगस्ट रोजी प्रत्येकी २४ बस

इथून सुटणार बस
मुंबईतील विविध ठिकाणांसह ठाणे, वसई, विरार, नालासोपारा, डोंबिवली

तिकीट नोंदणी आणि विक्री
सोमवार दि. २१ जुलैपासून बसच्या तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे. ‘स्वाभिमान’संघटना, १ डेक्कन, मूव्ही टाइम, सबर्बिया सिनेमाजवळ, एस. व्ही. रोड, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५०. दूरध्वनी : ०२२-२६४२१४५२.

8 COMMENTS

    • अंकुश पितलेकर,बोरीवली भ्रमण ध्वनी ९९२०४५६०६० ( साहेब आपण कोकणसाठी अशा सुविधा पुरविल्याने कोकणी जनता आपल्याला कधीच विसरणार नाही
      नेहमी तुमच्या बरोबरीने राहील गणपती बाप्पा त्या सर्वाना सुबुद्धी देवो

  1. साहेब आपण संघटनेत कोकणी चाकरमान्यांना सामाऊन घ्या आणि बघा तुम्हाला कोणी विसरू शकत नाही
    साहेब कोकणी जनतेच स्वप्न तुम्हिच पुरे करू शकता .गणपती बाप्पा तुमच्याकडून सत्कर्म
    करून घेउदे आणि तुम्हाला शक्ती देवो

    त्या सर्वाना सुबुद्धी देवो

  2. ५ मिनट मध्ये सर्व गाड्यांची ३०० वैतिंग आलीच कशी त्याची चोव्काशी करा .या गाड्या सोडून किती लोक गावी जाणार आणि गेलेच तर पुनः वापस कसे येणार .

  3. नितेश साहेब ,आपल्या सारखा नेता आम्हाला मिळाला धन्य झालो ! आपणाकडून निलेश साहेब थोडी डेरिंग घेतील हि अपेक्षा ?

  4. आपण नाव नोंदणी साठी केवळ बांद्रा हे ठिकाण न देता नवी मुंबई ,विरार ,बोरीवली, परेल, भायखळा ,लालबाग,पनवेल,कल्याण ,ठाणे अशी ठिकाणे द्यावी व त्यासोबत स्वाभिमान संघटनेचे फार्म द्यावे व ज्यांची इच्छा आहे त्यांना सामाऊन घ्यावे !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version