Home मध्यंतर उमंग वेलकम बॅक

वेलकम बॅक

1

बारावी पास झाल्यावर मी बी.एम.एम.मध्ये अॅडमिशन घेतलं. कॉलेज सुरू झाल्यावर एक-दोन महिन्यांतच वर्गात माझे अनेक मित्र बनले. मी आणि माझे दहा मित्र, असा आमचा कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप होता.

बारावी पास झाल्यावर मी बी.एम.एम.मध्ये अॅडमिशन घेतलं. कॉलेज सुरू झाल्यावर एक-दोन महिन्यांतच वर्गात माझे अनेक मित्र बनले. मी आणि माझे दहा मित्र, असा आमचा कॉलेजच्या मित्रांचा ग्रुप होता. लेक्चरला आम्ही सगळे मित्र एकत्रच कॉलेजमध्ये जायचो. एकमेकांची टिंगल-टवाळी करणे ही आमच्या ग्रुपची खासियत. म्हणून आमची कधी-कधी व्हॉट्सअॅप ग्रुपवर भांडणंसुद्धा व्हायची. पण या भांडणांमुळे कधीही आमचा ग्रुप तुटला नाही.

कारण आम्ही भांडणामध्येही एक वेगळीच मस्ती करायचो. आम्ही कितीही भांडलो तरी एकमेकांशी बोलल्याशिवाय राहायचो नाही. आम्ही दिवसातील बराच वेळ कॉलेजच्या ग्रुपसोबत घालवायचो. त्यामुळे आम्हाला एकमेकांचा वाढदिवस माहीत असायचा. ग्रुपमधल्या कोणत्याही मित्राचा वाढदिवस असला की, त्या दिवशी आम्ही सर्व मित्र केक घेऊन सरळ त्याच्या घरी पोहोचायचो आणि मग त्याच्या परिवारासोबत त्याचा वाढदिवस साजरा करायचो. या एका वर्षात आम्हा सर्वाची घट्ट मैत्री जमली.

ग्रुपसोबत फिरणे, पिक्चरला जाणे, एकत्र प्रोजेक्ट्स व असाइनमेंट्स करणे अशी मौज-मस्ती करत कॉलेजच्या पहिल्या वर्षातून दुस-या वर्षात उडी घेतली. या वर्षी आमचा संपूर्ण ग्रुप कॉलेजच्या इंडस्ट्रीयल व्हिजिटला जाणार हे आम्ही सर्वानी आधीच ठरवल होत.

जून महिन्यात कॉलेजच्या दुस-या वर्षाला सुरुवात झाली. कॉलेज सुरू होऊन काही दिवस उलटले तरी आमच्या ग्रुपचा एक मित्र कॉलेजमध्ये येत नव्हता आणि त्याबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं. व्हॉट्सअॅप ग्रुपमधूनही तो बाहेर पडला होता. फोन केला तर, फोनही स्विच ऑफ येत होता. म्हणून आम्ही काही दिवस अजून त्याची वाट बघितली, पण तरीही तो कॉलेजमध्ये गैरहजरच होता. म्हणून एके दिवशी आम्ही सगळे त्याच्या घरी गेलो तर घराच्या दरवाजावरही कुलूप लावलेलं होतं.

आता मात्र प्रत्येक जण वेग-वेगळे तर्क-वितर्क लावू लागले. मग एके दिवशी आम्ही सकाळी कॉलेजच्या लेक्चरला न बसता त्याच्या घरी गेलो. तेव्हा तो घरी एकटाच होता. तेव्हा आम्ही त्याला कॉलेजला न येण्याचं कारण विचारलं. त्याने सांगितल्यावर माहीत पडलं की, त्याच्या घरात मोठी समस्या उद्भवल्याने कॉलेजची फी भरण्यासाठी त्याकडे रक्कम नव्हती. म्हणून त्याने कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं नाही.

आता तो कामावर जातो. त्यामुळे आता एक वर्षाची गॅप पडणार होती. हे सगळं समजल्यावर धक्काच बसला. कारण आमच्या ग्रुपमध्ये आणि वर्गामध्ये नेहमी पहिला येणारा हा मित्र कॉलेजच्या दुस-या वर्षात आमच्याबरोबर नसणार हे समजल्यावर सगळ्यांचेच चेहरे उतरले. तो कामावर जात होता म्हणून त्याला दररोज भेटता येणं शक्य नव्हतं. म्हणून आम्ही सर्व त्याच्यासाठी एक दिवस काढायचो. रविवारची सकाळी आम्ही सर्व मंडळी त्याच्याच घरीच असायचो.

आठवडाभरच्या कॉलेजच्या बातम्या, प्रोजेक्ट्स-असाईनमेंट्स सगळं काही त्याच्याबरोबर शेअर करायचो आणि तोही आपल्या ऑफिसच्या गोष्टी सांगायचा. रविवारच्या दिवशी आमचा संपूर्ण ग्रुप एकत्र असायचा. वर्गात लेक्चर चालू असताना तो आमच्याबरोबर जरी नसला, तरी तो वेळ काढून आम्हाला आमच्या प्रोजेक्ट्सच्या कामात मदत करायला आवर्जून यायचा.

कॉलेजची इंडस्ट्रीयल व्हिजिट जाणार होती, पण आमच्या ग्रुपचा एक मित्र नव्हता म्हणून आम्ही इंडस्ट्रीयल व्हिजिटचा प्रोग्राम रद्द केला. यामध्येच दुसरे वर्षही संपले आणि मे महिन्याची सुट्टीमध्ये मजा केल्यावर बी.एम.एम.चं शेवटचं वर्ष सुरू होणार होतं.

तेव्हा त्या मित्राने व्हॉट्सअॅपवर मॅसेज केला की, तो यावर्षी कॉलेजमध्ये पुन्हा अॅडमिशन घेतोय. हा मॅसेज वाचून सर्वाना आनंद झाला आणि आम्ही त्याच्यासाठी एक सरप्राईज पार्टी ठेवायची असं ठरवलं. माझं घर कॉलेजच्या त्याला घेऊन माझ्या घरी आले आणि आम्ही त्याच्या हातून केक कापून ‘वेलकम बॅक’ म्हणत त्याला सरप्राईज पार्टी दिली. तोही खूप खूश झाला.

यावेळी त्याचे अश्रू अनावर झाले. सर्वाच्याच चेह-यावर आनंद होता. कारण पहिल्यासारखाच आता आमचा ग्रुप पुन्हा एकदा कॉलेजमध्ये एकत्र दिसणार होता. आमचा मित्र कॉलेजमध्ये एक वर्ष आमच्यासोबत नसला तरीही, आमच्या ग्रुपने त्याची साथ कधीही सोडली नाही.

1 COMMENT

  1. mitrano tumhi itke changle friends hota tar mag saglyani milun tyala admission sathi paise ka nahit dile.. ugach mitra ani group vagaire mhanta..tyala kadhi paishachi sudha nahi ka madat karu shaklat…
    This is not fare……..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version