Home देश शेतक-यासांठी ‘डीडी किसान’ वाहिनी लवकरच

शेतक-यासांठी ‘डीडी किसान’ वाहिनी लवकरच

0

शेतक-यांना शेतीसंबंधित संपूर्ण माहिती पुरवणारी २४ तास टिव्ही वाहिनी लवकरच सुरु केली जाणार आहे. 

नवी दिल्ली – शेतीसंबंधित संपूर्ण माहिती पुरवणारी २४ तास टिव्ही वाहिनी लवकरच सुरु केली जाणार आहे. या वाहिनीद्वारे हवामानाची स्थिती, बियाणे, शेतीसंबंधित सर्व विषयांचे मार्गदर्शन शेतक-यांना केले जाणार आह.

‘डीडी किसान’ या नावाने ही नवी वाहिनी सुरु करण्यात येणार आहे आहे. सरकार आणि प्रसार भारती या वाहिनीच्या लाँचिंगसंबंधित काम करत असून लवकरच हे काम पूर्ण होईल. डीडी किसान चॅनेल लवकरच सुरु होईल अशी घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी केली.

विविध अकरा भाषांमध्ये ही वाहिनी उपलब्ध होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप सत्तेवर आल्यास शेतक-यासांठी अशा प्रकारची नवी वाहिनी सुरु करणार असल्याचे आश्वासन भाजपने दिले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version