Home शिकू आनंदे संगीतात करिअर करण्यासाठी

संगीतात करिअर करण्यासाठी

0

सूर-तालावर अधिराज्य गाजवणारे दिग्गज संगीतकार ए.आर. रेहमान यांनी केएम म्युझिक कन्झव्‍‌र्हेटरी या आपल्या म्युझिक स्कूलच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पदवी अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.

या संगीत अकादमीमध्ये फाउंडेशन सर्टिफिकेट प्रोग्रॅम (१ वर्ष) आणि डिप्लोमा प्रोग्रॅम (२ वर्षे) हे दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अध्यापन, पार्श्वगायन, ध्वनितंत्रज्ञ, स्टुडिओ इंजिनीअर, जिंगल्स आणि फिल्म कंपोझर इत्यादी क्षेत्रांमधील करिअरची निवड करता येणार आहे.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीनुसार संबंधित अभ्यासक्रमासाठी प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ऑडिशनच्या माध्यमातूनच त्यांची निवड केली जाईल. यासाठी प्रवेश अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या पत्त्यावर कुरिअरनेही अर्ज (शुल्क रु. ११००/-) पाठवले जातील. ज्या विद्यार्थ्यांना मुद्रित माहितीपत्रक हवे असेल, ते आपल्या संपर्काच्या पत्त्यासह केएम म्युझिक कन्झव्‍‌र्हेटरीच्या नावे काढलेला एक डिमांड ड्राफ्ट काढून माहितीपत्रक मागवून घेऊ शकतात. २९ जुलैपासून मुख्य अभ्यासक्रमाला सुरुवात होणार असून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख ३० जून आहे.

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांचं वय १८ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे. तसंच त्यांनी बारावीच्या परीक्षेत किमान ब श्रेणी किंवा ५५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. प्रवेश प्रक्रियेचा एक भाग म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली जाईल. या मुलाखतीतून विद्यार्थ्यांची सांगीतिक पार्श्वभूमी, या क्षेत्रात येण्याचा उद्देश आणि समीक्षक पद्धतीने विचार करण्याचे कौशल्य पडताळून पाहिले जाईल.

अधिक माहितीसाठी संपर्क : ०४४-४३४४४७८६ किंवा ९००३०३२७८९ किंवा www.kmmc.in  या संकेतस्थळास भेट द्यावी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version