Home कोलाज संपूर्ण गीतरामायणाचा संचय

संपूर्ण गीतरामायणाचा संचय

1

१ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या दोन रामनवमीच्या मध्य ‘गीतरामायण’ नामाक माहाकाव्यातील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीतांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला अक्षरश: मंत्रमुग्ध केलं. स्वर आणि शब्द यांच्या माध्यमातून रामायणातील अनेकविध प्रतिमा जिवंत करण्याची किमया यांच्या या गीतरामायणाने साधली. या पुस्तकाला सुरुवातीला बा. भ. बोरकर, श्रीधर माडगूळकर, प्रदीप भिडे, भाऊ मराठे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यानंतर श्रीमंत बाळासाहेब महाराज यांनी १९११-१४ दरम्यान काढलेली ‘चित्ररामायण’ पाहायला मिळतं. जी काही चित्रं गाण्यांना साजेशी आहेत, त्यांची निवड करून त्या चित्रांना त्या गाण्यांची नावं देण्यात आली आहेत. त्यातल्याच एका चित्राचा मुखपृष्ठावर वापर केलेला दिसतोय.

आदिकवी वाल्मीकी यांच्या काव्यरूपाचा आविष्कार असलेली रामायणाची कथा मानवी मनाला भुरळ घालणारी आहे. त्यात भर पडली ती १ एप्रिल १९५५ या रामनवमीच्या दिवशी. मराठी संस्कृतीत जणू अद्भुत चमत्कार घडला त्या चमत्काराचं नाव गीतरामायण. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले गीतरामायण बाबुजी अर्थात सुधीर फडके यांच्या सुस्वर कंठातून आकाशवाणीवरून बाहेर पडताच सा-या महाराष्ट्राने सर्वेद्रियाचे कान केले. १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ या दोन रामनवमीच्या मध्य ‘गीतरामायण’ नामाक माहाकाव्यातील आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या गीतांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आणि घरातील प्रत्येकाला अक्षरश: मंत्रमुग्ध केलं.

स्वर आणि शब्द यांच्या माध्यमातून रामायणातील अनेकविध प्रतिमा जिवंत करण्याची किमया यांच्या या गीतरामायणाने साधली. इतके गदिमांना महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी म्हणून संबोधले जाऊ लागले. ग. दि. माडगूळकर आणि हे शब्दप्रभू आणि संगीतकार सुधीर फडके हे स्वरप्रभू एकत्र आल्यानेत हा सांगितिक खजिना आपल्या वाटय़ाला आला. म्हणूनच आज सहा शकं उलटूनही त्यांची मोहिनी कमी झालेली नाही. पुढे गीतरामायणाची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की अनेक भारतीय भाषांमधून त्याचे अनुवाद झाले आणि ही गाणी ध्वनिमुद्रीतही केली गेली. स्वत: बाबुजींनी या गीतरामायणाचे १८०० प्रयोग केले.

आजही गीतरामायण म्हटलं की स्वये श्री रामप्रभु ऐकती, दशरथा, घे हे पायसदान, राम जन्मला गं सखी, सावळा गं रामचंद्र, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, मार ही त्राटिका, स्वयंवर झाले सीतेचे, रामावीण राज्यपदी कोण बैसतो? जेथे राघव तेथे सीता, जय गंगे जय भागीरथी, दैवजात दु:खे भरता, सन्मित्र राघवाचा सुग्रीव आज झाला, सेतु बांधा रे सागरी, भुवरी रावणवध झाला, गा बाळांनो श्रीरामायण.. ही बाबुंजींच्या मधुर स्वरातील गाणी आजही ओठी येतात. अशा या ५६ गीतांची कहाणी, त्या गीतांची पार्श्वभूमी, त्यातील शाब्दिक आणि सांगितिक सामर्थ्य मुकुंद सराफ यांनी नवशक्ती या वृत्तपत्रातून दर आठवडय़ाला मांडायला सुरुवात केली. या लेखांचा संचय म्हणजे या ‘काव्य नव्हे अमृतसंचय’ या पुस्तकाचा जन्म होय. गीतरामायणाच्या हीरकमहोत्सवी वर्षात हे लेख प्रसिद्ध झाले. या लेखांचा संचय म्हणजे हे पुस्तक होय.

या पुस्तकाला सुरुवातीला बा. भ. बोरकर, श्रीधर माडगूळकर, प्रदीप भिडे, भाऊ मराठे, प्रभाकर सूर्यवंशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. त्यानंतर श्रीमंत बाळासाहेब महाराज यांनी १९११-१४ दरम्यान काढलेले ‘चित्ररामायण’ पाहायला मिळते. जी काही चित्रं गाण्यांना साजेशी आहेत त्यांची निवड करून त्या चित्रांना त्या गाण्यांची नावं देण्यात आली आहेत. त्यातल्याच एका चित्राचा मुखपृष्ठावर वापर केलेला दिसतोय. त्यानंतर प्रत्येक गीताचा अर्थ, त्या गीताचे गायक, गीताचा राग, याची सविस्तर माहिती वाचायला मिळते.

त्यामुळे नवीन वाचणा-यांना या गीताचं अर्थपूर्ण गीत समजेल असं म्हणायला हरकत नाही. याशिवाय शेवटी दिलेल्या परिशिष्टांमधून बरीचशी माहिती दिली आहे. आकाशवाणीवर प्रसारित केलेल्या गीतरामायण गायन कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायक आणि गायिकांची नावं आणि त्यांनी सादर केलेली गीतं यांची यादी दिलेली आहे. त्यातील सुधीर फडके, माणिक वर्मा, राम फाटक, वसंतराव देशपांडे, वि. ल. इनामदार, सुरेश हळदणकर, बबनराव नावडीकर, गजानन वाटवे, चंद्रकांत गोखले, ललिता फडके, मालती पांडे, प्रमोदिनी जोशी, मंदाकिनी पांडे, योगिनी जोगळेकर, कुमुदिनी पेडणेकर.

लता मंगेशकर, सुमन माटे, जानकी अय्यर, उषा अत्रे आदी गायक आणि गायिकांची नावं वाचायला मिळतात. परिशिष्ट दोनमध्ये गीतारामायणातील गीतांची साथसंगत करणा-या कलावंतांची नावं वाचायला मिळतील. तर परिशिष्ट ३ मध्ये केहरवा एकताल, दादरा, झंपा, त्रिताल आणि रूपक या रागांपैकी कोणतं गाणं कोणत्या रागावर आधारित आहे, हे सांगितलं आहे.

ज्यांना गीतरामायण आवडतं त्यांच्यासाठी आणि जे हे पुस्तक वाचतील त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे खरोखरच काव्याचा अमृतसंचय ठरणार आहे. कारण हे पुस्तक म्हणजे संपूर्ण गीतरामायणाचा उलगडा करणारंच आहे आणि त्यानिमित्ताने गीतरामायण्याच्या स्मृती जागवल्या गेल्या आहेत. ज्यांना या गीतरामायणाची माहिती आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे संपूर्ण गीतरामायणाचा संचयच आहे, असं म्हटलं तरीही चालेल.

गीतरामायण : काव्य नव्हे हा अमृतसंचय
लेखक : मुकुंद सराफ
पृष्ठ : १७४
मूल्य : २५० रुपये

1 COMMENT

  1. मला हा गीत रामायणाचा संचय हवा आहे. कोणाकडून मिळेल त्या व्यक्तीचे नाव व नंबर email द्वारे कळवता का?
    अदिती पराडकर यांस – “परिशिष्ट ३ मध्ये केहरवा एकताल, दादरा, झंपा, त्रिताल आणि रूपक या रागांपैकी कोणतं गाणं कोणत्या रागावर आधारित आहे” तुम्हाला बहुतेक “रागांपैकी” ऐवजी “ताल्नपैकी म्हणायचे होते का? या पुस्तकात गीत रामायणाची गाणी कोणत्या रागदारी वर आहे, ही माहिती सुधा आहे का?
    राजेश बिबीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version