Home एक्सक्लूसीव्ह सत्यम लॉज : संतोष शेट्टींना ‘लीज’ कुणी दिली?

सत्यम लॉज : संतोष शेट्टींना ‘लीज’ कुणी दिली?

1

ठाण्याच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या उपवन विभागात जमिनीखाली बांधलेल्या सत्यम लॉजच्या २९० खोल्यांचे गूढ आता अधिक उलघडत आहे. सत्यम हॉटेल चालविणा-या सत्यम शेट्टीला २०१४ साली रद्द झालेली लीज वाढवून कुणी दिली? याची चौकशी करण्याची मागणी ठाण्यामध्ये होत आहे.

ठाणे- ठाण्याच्या उच्चभ्रू वस्ती असलेल्या उपवन विभागात जमिनीखाली बांधलेल्या सत्यम लॉजच्या २९० खोल्यांचे गूढ आता अधिक उलघडत आहे. सत्यम हॉटेल चालविणा-या सत्यम शेट्टीला २०१४ साली रद्द झालेली लीज वाढवून कुणी दिली? याची चौकशी करण्याची मागणी ठाण्यामध्ये होत आहे. १९३५ साली ब्रिटिश सरकार असताना त्यावेळच्या मध्य प्रदेश सरकारने ही जागा ९९ वर्षाच्या कराराने भाडेतत्त्वावर घेतली होती. त्यानंतर भाटिया नावाच्या एका व्यक्तीने मध्य प्रदेश सरकारकडून सत्यम लॉजची जागा लीजवर घेतली आणि ही जागा संतोष शेट्टीला भाटिया यांनी लीजवर दिली. त्यानंतर याठिकाणी चाललेल्या अनैतिक धंद्याची राजरोस चर्चा?होत असताना महापालिकेने कारवाई ?केली नव्हती. २५ वर्षात सर्व राजकीय पक्ष नेते यांना संतोष शेट्टींनी आपल्या पेरोलवर ठेवून आपले अनैतिक धंदे केले, ते धंदे आता उघड होत आहेत.

मध्य प्रदेश सरकारने प्रॉव्हिडंड फंडातून ठाण्यातील अनेक जागा विकत घेतल्या असून त्या लीजवर दिल्या आहेत. अशाच प्रकारे उपवन तलावाजवळील हा जवळपास अर्धा एकरचा भूखंड मध्य प्रदेश सरकारने विकत घेऊन तो सुमारे ३५ ते ३६ वर्षापूर्वी दिलीप भाटिया नामक इसमाला लीजवर दिला होता. त्यावर भाटियाने लॉज बांधला. मात्र त्यावेळी ठाणे महापालिका अस्तित्वात नसल्याने ग्रामपंचायतीची बांधकाम परवानगी या लॉजला आहे. १९९९ साली ठाणे महापालिकेने या लॉजच्या १६ खोल्यांना कर लावला होता. तर उर्वरित खोल्या अधिकृतपणे दाखवण्यात आल्या नव्हत्या. या खोल्या तळघरात बांधण्यात आल्या होत्या. या लॉजवर २०१४ साली ठाणे पोलिसांच्या मानवी तस्करीविरोधी पथकाने कारवाई करत या लॉजचा परवाना रद्द केला होता. मात्र २०१६ साली पुन्हा या लॉजला परवाना देण्यात आला आणि संतोष शेट्टी याने हा लॉज चालवण्यास घेतला असे समजते. या लॉजमध्ये मोठय़ा प्रमाणात वेश्याव्यवसाय चालत असल्याचे पालिकेच्या कारवाईदरम्यान समोर आले असून त्यामुळे खळबळ माजली आहे.

पोलीस निरीक्षकाची बदली

ठाणे महापालिकेने या लॉजवर कारवाई केल्यानंतर पोलिसांवर मात्र मोठी टीका होऊ लागली आहे. शहरात असे अवैध धंदे मोठय़ा प्रमाणात सुरू असूनही पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचे आरोप होत आहेत. यातूनच हा लॉज ज्या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतो, त्या वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. जी. गावित यांची ठाणे नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्वाची चौकशी करण्यात येणार असून जे जबाबदार आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितले आहे.

1 COMMENT

  1. अजब तुझे सरकार उद्धवा!!!! आता गरीब आणि कार्यतत्पर पोलीस अधिकारी आणि शिपायांचे बळी देणार तर सरकार. स्वतःचे खिशे भरले आणि इलेकशन फंड मिळाला ह्यांचे काम झाले तर. ५ वर्ष्यात देशाला विकणार आहेत हे साले भिकारी लोक .

Leave a Reply to akshay adivarekar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version