Home मनोरंजन सनमित कौर बनल्या ‘पंचकोटीमहामणी’

सनमित कौर बनल्या ‘पंचकोटीमहामणी’

0
सनमित कौर यांनी केबीसीमध्ये 'पंचकोटी महामणी' होण्याचा मान पटकावला.

सनमित कौर यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात पाच कोटी रुपये जिंकून पहिल्या महिला करोडपती होण्याचा मान पटकावला आहे.

सनमित कौर यांनी केबीसीमध्ये ‘पंचकोटी महामणी’ होण्याचा मान पटकावला.

मुंबई –  सनमित कौर यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात पाच कोटी रुपये जिंकून पहिल्या महिला करोडपती होण्याचा मान पटकावला आहे.

सनमित ह्या मुंबईत राहतात. त्या गृहिणी असून घरात मुलांच्या शिकवणी घेतात. माझ्या वडिलांना खूप इच्छा होती की मी खूप शिकावे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकले नाही. लग्नानंतरच्या सांसारिक जबाबदारीमुळे मी फक्त बारावीपर्यंतचं शिकू शकले. माझ्यावर एक शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी घरात लहान मुलांची शिकवणी घेण्यास सुरुवात केली. अधिकाधिक ज्ञान संपादन करणे म्हणजे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे यावर माझा विश्वास आहे. केवळ पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा जगातील चालू घडामोडींविषयी अभ्यास केल्याचा मला आज फायदा झाला आहे, अशा शब्दांत  सनमित यांनी आपला आनंद व्यक्त केला.

सनमित कौर यांनी दोन्ही मुलींना उच्चशिक्षित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सनमित यांचे पती मनमित हे छोटेखानी अभिनेते असून रामगोपाल वर्मा यांच्या जंगल चित्रपटासह अंदाजे १५० चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.

कौन बनेगा करोडपतीमध्ये भाग घेण्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केला. पण यावेळी माझं नशीब उघडले. पाच कोटी रुपये मिळाल्यानंतरही त्यांनी कोणतेही स्वप्न अजून पाहिलेले नाही. मात्र यातील काही रक्कम मी स्वयंसेवी संस्थांना दान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कौन बनेगा करोडपतीचा हा शो १२ जानेवारीला प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version