Home टॉप स्टोरी बलात्काराला तरुणीच जबाबदार

बलात्काराला तरुणीच जबाबदार

5

दिल्ली सामूहिक बलात्काराच्या घटनेला पीडित तरूणीच जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य करुन आसारामबापू यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.
नवी दिल्ली- दिल्लीत बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेला पीडित तरूणीच जबाबदार असल्याचे खळबळजनक वादग्रस्त वक्तव्य करुन अध्यात्मिक गुरु आसारामबापू यांनी अकलेचे तारे तोडले आहेत.

या घटनेला फक्त ५-६ जणांना आरोपी ठरवून चालणार नाही. टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन हाताने वाजते, बलात्कार करणा-या आरोपींप्रमाणे ही तरूणीही त्याला तितकीच जबाबदार आहे. या तरूणींने आरोपींना भाऊ म्हणत त्यांच्याकडे दया मागून तेथून निघून जायला हवे होते. कदाचित यामुळे त्या तरूणीची अब्रू आणि जीव वाचला असता, अशी मुक्ताफळे या अध्यात्मिक गुरूंनी उधळली आहेत.

तसेच या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यालाही आसाराम बापूंनी विरोध दर्शवला आहे. आपण कायम कायद्याचा दुरुपयोग होताना पाहिले असल्याने बलात्कारासंबंधी बनवण्यात येणा-या कायद्यांचा दुरुपयोगच होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ उडाली आहे.

[poll id=”128″]

अरे, यांनाही कोणीतरी आवरा!

दिल्लीमध्ये इंडिया गेटवर निदर्शनांसाठी उतरलेल्या सगळ्या महिला काही महाविद्यालयीन नव्हत्या. या रंगरंगोटी करून आलेल्या सुंदर स्त्रिया स्वत:च्या मुलींना निदर्शने कशी असतात ते दाखवण्यासाठी घेऊन आल्या होत्या. – अभिजित मुखर्जी, काँग्रेस खासदार
ग्रामीण भागांमध्ये (भारत) बलात्कार होत नाहीत, शहरी भागांमध्ये (इंडिया) होतात. बलात्कार थांबवण्यासाठी खरीखुरी भारतीय मूल्ये रुजवली पाहिजेत.- मोहन भागवत, सरसंघचालक
एकच कारण आहे, ते म्हणजे मर्यादा. मर्यादेचे उल्लंघन झाले की सीताहरण होणारच. प्रत्येकाची लक्ष्मणरेषा ठरलेली असते, ती ओलांडल्यास बाहेर रावण बसलेलाच असतो. तो सीतेचे हरण करेल. – कैलास विजयवर्गीय, उद्योगमंत्री, मध्य प्रदेश
एकच कारण आहे, ते म्हणजे मर्यादा. मर्यादेचे उल्लंघन झाले की सीताहरण होणारच. प्रत्येकाची लक्ष्मणरेषा ठरलेली असते, ती ओलांडल्यास बाहेर रावण बसलेलाच असतो. तो सीतेचे हरण करेल. – कैलास विज
पाश्चिमात्य जीवनशैलीमुळे महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. आमच्या शहरांमधील मूल्ये हरवत आहेत. आधी कौमार्य अबाधित राखण्यास महत्त्व होते, आता तसे राहिलेले नाही. – अशोक सिंघल, अध्यक्ष, विश्व हिंदू परिषद

महिला कार्यकर्त्यांची नाराजी

आसाराम बापूंनी अतिशय चुकीचे विधान केले आहे. त्यातून त्यांची मनोवृत्ती दिसून येते. त्यांना श्रद्धास्थानी मानणारा वर्ग मोठा आहे. या वक्तव्यामुळे कदाचित त्यांच्या भक्तांनाच लाज वाटेल. अशी विधान करणा-या आसाराम बापूंच्या ‘साधू’पणाबद्दलच संशय निर्माण होतो. – नीला लिमये, अध्यक्ष, महाराष्ट्र महिला परिषद
आसाराम बापूंचे वक्तव्य असंवेदनशील आहे. बलात्कार करणा-याला भाऊ म्हणून त्याची माफी मागावी, ही अपेक्षाच चुकीची आहे. त्यांच्या वक्तव्यावरून आपला समाज कसा आहे, हे आपल्याला कळते. आपण बलात्कार करणा-यांची बाजू घेणे अपेक्षित आहे की, जी पीडित आहे तिची बाजू घ्यायची? अविचारी बोलणे, याशिवाय यावर अधिक काय बोलू शकतो? – अ‍ॅड. रमा सरोदे, सल्लागार, सहयोग ट्रस्ट

 

 

 

5 COMMENTS

  1. महान नारी ” या पुस्तकात आसाराम बापूने महिलांविषयी आणखी भयानक तारे तोडले आहेत.

  2. आसाराम बापूच्या डोक्यावर परिणाम झालय …….कि आसाराम बापूच्या गूढग्याला मार लागलाय. आशा साधूंच्या आश्रमाला आणि त्यांच्या प्रवचनाला बंदी आणावी. आशा साधू मुले हिंदू धर्माला कलंक आहेत. कुठे गेले हिंदू धर्म संस्थापक साधू आणि भोंदू आसाराम बापू नव्हे हिंदू धर्माचा आसरा मागणारे बापू असामान्य बापू आहेत. मराठीमध्ये दोन ओळी आठवल्या
    हरी – हरी हि गोष्ठ नाही बरी !!
    बुवा कीर्तन करी पण नजर ………….. !!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version