Home क्रीडा सातत्य राखण्यास राजस्थान उत्सुक

सातत्य राखण्यास राजस्थान उत्सुक

0

आयपीएलच्या आठव्या हंगामातील ‘संडे स्पेशल’ पहिल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. 

नवी दिल्ली – आयपीएलच्या आठव्या हंगामातील ‘संडे स्पेशल’ पहिल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. विजयी सलामीने आत्मविश्वास उंचावलेला राजस्थान संघ सातत्य राखण्यास उत्सुक आहे. याउलट आयपीएलमधील तब्बल १० पराभवांची मालिका खंडित काढण्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे.

नियोजित कर्णधार शेन वॉटसनच्या उजव्या गुडघ्याची दुखापत राजस्थानसाठी चिंतेचे कारण आहे. दिल्लीविरुद्ध वॉटसन खेळण्याची शक्यता आहे. राजस्थानची फलंदाजी बहरली तरी सलामीवीर अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन आणि करुण नायरला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.

जेम्स फॉकनरने अष्टपैलू कामगिरी केली तरी त्याच्यावर प्रत्येक वेळी अवलंबून राहणे, योग्य नाही. मात्र त्याच्यासह वेगवान टिम साउदी, मध्यमगती धवल कुलकर्णी आणि लेगब्रेक प्रवीण तांबेमुळे गोलंदाजीत चिंतेचे कारण नाही. मात्र सलग दुस-या विजयासाठी राजस्थानसमोर सातत्य राखण्याचे मोठे आव्हान आहे.

माजी विजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध निसटता पराभव पाहावा लागल्याने दिल्लीला चुटपूट लागून राहिली आहे. लेगस्पिनर इम्रान ताहीर, कर्णधार जेपी दुमिनी आणि लेगस्पिनर अमित मिश्राने अचूक मारा करताना प्रतिस्पध्र्याना कमीत कमी धावांत रोखले तरी फलंदाजांनी निराशा केली. अष्टपैलू युवराज सिंग, क्विंटन डी कॉक, केदार जाधव, मयांक अगरवाल, मनोज तिवारीवर त्यांची फलंदाजांची भिस्त आहे.

फलंदाजी उंचावण्यासाठी हे फलंदाज फॉर्मात येणे, आवश्यक आहे. नव्याने बांधणी करण्यात आलेला दिल्ली संघ घरच्या मैदानावर खेळतोय. त्यामुळे दुमिनी आणि सहकारी मागील चुका टाळून पराभवाची खंडित करतील, असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना वाटतो.
वेळ : सायं. ४ वा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version