Home महाराष्ट्र कोकण साळशीत बिबटयाची मृत्यू झेप

साळशीत बिबटयाची मृत्यू झेप

0

भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबटय़ाने थेट विहिरीत झेप घेतली अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना साळशी-नाईकवाडी येथे घडली. 

शिरगाव – भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबटय़ाने थेट विहिरीत झेप घेतली अन् त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना साळशी-नाईकवाडी येथे घडली. देवगड तालुक्यातील साळशी-नाईकवाडी येथील विक्रांत नाईक यांच्या विहिरीत बिबटय़ा पडल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर गावच्या पोलिस पाटील कामिनी नाईक यांनी तत्काळ फोंडा येथील वनरक्षक शशिकांत साटम यांना कळवले.

या वेळी वनरक्षक घटनास्थळी आल्यानंतर साळशी येथील ग्रामस्थ हिरोजी नाईक व प्रभाकर वेंगसरकर यांच्या सहकार्याने मृत बिबटय़ाला बाहेर काढण्यात आले. सदर बिबटय़ाचे वय दोन अडीच वर्षाचे असावे तसेच तो २-३ दिवसांपूर्वी भक्ष्याच्या शोधात पाठलाग करत असताना सुमारे ४० फूट खोली असलेल्या विहिरीत पडला असावा, असा अंदाज वनरक्षकांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. ठेकणे, शिरगावचे डॉ. पी. के. गडेकर यांनी शवविच्छेदन केले. वनक्षेत्रपाल पाटील, वनपाल नाना तावडे, ब. रा. मिठबावकर, वनरक्षक मणेर, चव्हाण, वनमजूर भालेकर, गावकर आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या वेळी ग्रामस्थांनी बिबटय़ाला पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version