Home महाराष्ट्र कोकण सावंतवाडीत दीपक केसरकर तर कुडाळात वैभव नाईक विजयी

सावंतवाडीत दीपक केसरकर तर कुडाळात वैभव नाईक विजयी

1

सावंतवाडीत मतदार संघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांना ७० हजार ५३२ मते मिळवून विजय मिळवला. 
सिंधुदुर्ग – सावंतवाडीत मतदार संघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांना ७० हजार ५३२ मते मिळवून विजय मिळवला. त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांच्या पेक्षा ४० हजार ८६८ मतांची आघाडी घेतली.

तर कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे वैभव नाईक १० हजार ३७६ एवढय़ा मताधिक्याने विजयी झाले. त्यांना ७० हजार ५८२ तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे नारायण राणे यांना ६० हजार २०६ मते मिळाली.
कुडाळमध्ये चौघांचे डिपॉझिट जप्त

कुडाळ मतदार संघात भाजपाचे उमेदवार विष्णू मोंडकर यांना अवघी ४ हजार ८१९, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्पसेन सावंत यांना २ हजार ६९२, बसपाचे रवींद्र कसालकर यांना १ हजार ७१, व अपक्ष स्नेहा केरकर यांना केवळ ७४७ मते मिळाल्याने या चारी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

सावंतवाडीत ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
सावंतवाडीत भाजपचे राजन तेली यांना २९ हजार ६६४, काँग्रेसचे बाळा गावडे यांना २५ हजार ३३४, राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांना ८ हजार ९८५, मनसेचे परशुराम उपरकर यांना ६ हजार १३१, बसपाचे वासुदेव जाधव यांना ७८८, अखिल भारतीय हिंदू महासभाचे अजिंक्य गावडे यांना ८८२, अपक्ष उदय पास्ते यांना ४४९, संजय देसाई यांना ६९५, किशोर लोंढे यांना ३९७ अशी मते मिळाली. सावंतवाडीत ७ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मते काँग्रेसला
सिंधुदुर्ग जिल्हय़ात काँग्रेसला सर्वाधिक १ लाख ६० हजार २९७, शिवसेनेला १ लाख ५४ हजार ३४७, भाजपला ८३ हजार २१९, राष्ट्रवादीला १९ हजार ८७३, तर मनसेला ६ हजार १३१ मते मिळाली.

३८४१ मतदारांकडून नोटाचा वापर
जिल्हय़ात ३ हजार ८४१ मतदारांनी नोटाचा वापर केला. सावंतवाडीत १५११, कणकवलीत १३८१, तर कुडाळमध्ये ९४९ जणांनी नोटाचा (नकाराधिकाराचा)वापर केला. जिल्हय़ात अपक्ष उमेदवारांना मात्र मतदारांनी नाकारले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version