Home विज्ञान तंत्रज्ञान सिगारेटच्या पाकिटातून धूम्रपानमुक्तीचा बोलका संदेश

सिगारेटच्या पाकिटातून धूम्रपानमुक्तीचा बोलका संदेश

0

सिगारेट ओढणा-यांनी सिगारेटचे दुष्परिणाम लक्षात घेऊन मगच सिगारेट खरेदी करावी किंवा ती सोडून द्यावी यासाठी सिगारेटच्या पाकिटांवर वेगवेगळे संदेश लिहिलेले असता.

सिगारेट ओढणा-यांनी सिगारेटचे दुष्परिणाम लक्षात घेऊन मगच सिगारेट खरेदी करावी किंवा ती सोडून द्यावी यासाठी सिगारेटच्या पाकिटांवर वेगवेगळे संदेश लिहिलेले असता. पण जर सिगारेटचे पाकीटच सिगारेट सोडायला सांगू लागले तर धूम्रपान करणाराही त्याचा गांभीर्याने विचार करेल, असे बहुधा शास्त्रज्ञांना वाटत असावे. याच हेतूने इंग्लंडमधील स्टर्लिग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सिगारेट सोडण्याचा संदेश देणारी बोलणारी पाकिटे तयार केली आहेत.

या दोन्ही पाकिटांमधून ध्वनिमुद्रित केलेले वेगवेगळे संदेश ऐकवले जातात. एका पाकिटामधून ज्यांना धूम्रपान सोडण्यासाठी विशेष सल्ला किंवा मार्गदर्शन हवे आहे, अशांना त्या संस्थेचा किंवा व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक दिला जातो. तर दुस-या पाकिटामधून धूम्रपानामुळे प्रजोत्पादनक्षमता कमी होत असल्याचा इशारा दिला जातो.

वाढदिवसाच्या शुभेच्छापत्रांमध्ये ज्या प्रकारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे संदेश ध्वनिमुद्रित करणारे तंत्र वापरले जाते, त्याच प्रकारचे तंत्र या सिगारेटच्या पाकिटात वापरले आहे. या पाकिटात आवाज ध्वनिमुद्रित करणारे व जेव्हा त्याचे झाकण उघडले जाईल त्या वेळी तो संदेश ऐकवणारे यंत्र बसवले आहे.

सिगारेट कंपन्यांकडून त्यांची वेष्टने आकर्षक करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधून शास्त्रज्ञांना अशा प्रकारचे पाकीट तयार करण्याची प्रेरणा मिळाली. ब्रिटनमध्ये १६ ते २४ या वयोगटामध्ये धूम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक असल्याने, अशा प्रकारच्या पाकिटांचा वापर या वयोगटातील मुलींवर करण्यात आला. सिगारेटमुळे प्रजोत्पादनावर परिणाम होत असल्याचा या पाकिटांवरील संदेश जास्त परिणामकारक ठरला. या संदेशामुळे आपण धूम्रपान सोडण्याबाबत विचार करू लागलो, असे १६-१७ वयाच्या मुलींनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version