Home कोलाज सिगारेट

सिगारेट

1

सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम, तंबाखू सेवनामुळे होणारी मानवी आरोग्याची हानी, यासंबंधी जनजागृती नेहमीच केली जाते. सिनेमागृहांमधे सिनेमाच्या आधी त्या आशयाची दृक-श्राव्य फीत दाखवली जाते. तरीही सिगारेटच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. उलट अजून चिथावल्यागत ती व्यक्ती सिगारेट ओढणं चालू ठेवते.
कायद्याने सुट्या सिगारेट्सच्या विक्रीवर निर्बंध येणार आहेत, अशी बातमी काल वाचनात आली. ही बातमी वाचून अर्थातच समाधान वाटलं. समाधान हेच की आता सिगारेट ओढणा-यांना ती ओढण्यापासून परावृत्त करणारं आणखी एक कारण अस्तित्वास आलं. डब्ल्यू. एच. ओ.च्या धोरणानुसार, सुट्या सिगारेट विक्रीवर निर्बंध लादलेच पाहिजेत. कारण त्यांच्या सुट्या विक्रीमुळे त्या सज्ञान नसलेल्या तरुणांच्या अधिक अवाक्यात येतात.

सिगारेट ओढण्याचे दुष्परिणाम, तंबाखू सेवनामुळे होणारी मानवी आरोग्याची हानी, यासंबंधी जनजागृती नेहमीच होत आलेली आहे. सध्या सिनेमागृहांमधे सिनेमाच्या आधी त्या आशयाची दृक-श्राव्य फीत दाखवली जाते. दूरचित्रवाणीवरही ती फीत आजकाल पाहायला मिळते. या सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात. तरीही सिगारेटच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. उलट अजून चिथावल्यागत ती व्यक्ती सिगारेट ओढणं चालू ठेवते.

असंच एक उदाहरण मला दुस-या दिवशी बघायला मिळालं. मी ही बातमी माझ्या एका सहकर्मचा-याला सांगितली. हा सहकर्मचारी सिगारेट ओढणा-यांपैकी होता. त्यामुळे त्याला ही बातमी अर्थातच जाणून बुजून सांगत होतो. यासंदर्भात एखाद्याचं मन बदलायचा प्रयत्न केल्यास स्वत:चाच अपमान ओढवतो, तसा वाईट अनुभव मला आधी आलेला असल्याने इथे केवळ त्याची प्रतिक्रिया बघणं हाच उद्देश होता. त्याला ही बातमी सांगितल्यावर आधीच सिगारेटमुळे घोग-या झालेल्या आवाजात तो युक्तिवाद करू लागला. ‘आप पेन्सिल सेल एक लेते हो, तो कितनेका आता है? आठ या दस रुपया. जो भी है. पर एक साथ पुरा पॅकेट खरीदो तो? सस्ता गिरता है ना?.. ऐसाही है. लूज सिगारेट बॅन करेंगे तो क्या होगा? लोग पॅकेट्स खरीदने लगेंगे. और वैसे भी, हर पानवाले के पास थोडी पुलिस खडी रहेगी? वो तो लूज बेचेगाही. कोई फरक नही पडता.’

हा त्याचा प्रतिसाद अपेक्षितच होता एका अर्थी. दूरदर्शन वर ‘कोई फरक नही पडता..’ ही ओळ असलेली एक जनजागृतीची जाहिरात यायची, तिची आठवण झाली. ‘तेरी मर्जी’ म्हणण्यावाचून माझ्याकडे तरी काहीही पर्याय नव्हता. सिगारेटपायी गॉन केस झालेल्यांच्या माझ्या यादीत आणखी एका नावाची भर पडली.

जाहिराती, फलक यांमार्फत केल्या जाणा-या जनजागृतीचं पर्यवसान तंबाखू किंवा सिगारेटचे दुष्परिणाम किती आहेत याची प्रत्येकाला माहिती करून देण्यात नक्कीच होतं. परंतु या माहितीचं रूपांतर जाणिवेत जेव्हा होईल, तो खरा सुदिन असेल.

1 COMMENT

  1. अशा बेशरम लोकांनी त्यापेक्षा दारू पिउन मरावे, उगाच बाकीच्या लोकांना प्यासीव स्मोकर बनवण्यात काय अर्थ आहे… 🙁

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version