Home महाराष्ट्र सुहास खामकरला जामीन

सुहास खामकरला जामीन

0

पनवेलचा नायब तहसीलदार असलेल्या सुहास खामकर याला गुरुवारी अलिबागच्या सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
नवी मुंबई- प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू आणि पनवेलचा नायब तहसीलदार असलेल्या सुहास खामकर याला गुरुवारी अलिबागच्या सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

सुहास खामकर याने ७/१२वर नाव चढवण्याकरता शरद सावंत या व्यक्तीकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून, त्याच्यासाठी लाच घेणा-या त्याचा साथीदार गणेश भोगाडे याला अटक केली होती. भोगाडेच्या चौकशीतच सुहास खामकरचे नाव पुढे आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version