Home विज्ञान तंत्रज्ञान मंगळ ग्रह केवळ १४ टक्के दूर…

मंगळ ग्रह केवळ १४ टक्के दूर…

1

भारताच्या मंगळ यानाचा ८६ टक्के प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला असून आता केवळ १४ टक्के प्रवास शिल्लक आहे.
बंगळूरू- भारताच्या मंगळ यानाचा ८६ टक्के प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला असून आता केवळ १४ टक्के प्रवास शिल्लक आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या(इस्त्रो) या महत्वकांक्षी मोहिमेतील अंत्यत महत्त्वाचा काळ सुरु झाला आहे.

पृथ्वीवरुन मंगळयानाशी संवाद साधण्यात येणारे मध्यम ग्रेन अँटिनाची जोडणी यशस्वी झाल्याचे इस्त्रोने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर म्हटले आहे.

भारताच्या या मोहिमेने आपल्या ऐतिहासीक प्रवासाकडे कूच सुरु केली आहे. इस्त्रोने मंगळ मोहिमेतील पहिली मार्गक्रमण दुरुस्ती (ट्रॅजेक्टरी करेक्शन मोनोव्हरू) ११ डिसेंबर २०१३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण केली होती.  अशा प्रकारची मार्गक्रमण दुरुस्ती आता करण्यात येणार नसल्याचे इस्त्रोने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले होते.

भारताने या मोहिमेसाठी तब्बल ४५० कोटी रुपये खर्च केले आहेत.  या यानाने पाच नोव्हेंबर २०१३ रोजी आपला प्रवास सुरु केला होता.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version