Home क्रीडा स्कोलारी, ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

स्कोलारी, ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

1

फुटबॉल जगतातील दिग्गज प्रशिक्षकांमध्ये गणना होणा-या लुईझ फिलीप स्कोलारी यांनी ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

रिओ दी जानेरियो – फुटबॉल जगतातील दिग्गज प्रशिक्षकांमध्ये गणना होणा-या लुईझ फिलीप स्कोलारी यांनी ब्राझीलच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. उपांत्यफेरीत जर्मनीकडून झालेल्या ७-१ अशा मानहानीकारक पराभवामुळे ब्राझीलचे सहाव्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात आले.

ब्राझीलच्या या सुमार कामगिरीनंतर स्कोलारी यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव येत होता. त्यानंतर तिस-या स्थानासाठी झालेल्या लढतीतही हॉलंडने ब्राझीलला ३-० असे नमवले. या पराभवानंतर स्कोलारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. ब्राझीलच्या फुटबॉल संघटनेने त्यांचा राजीनामा स्वीकारल्याची सूत्रांची माहिती आहे.

शनिवारी ब्रासिलियामध्ये झालेल्या सामन्यात हॉलंडकडूनही ब्राझीलचा दारुण पराभव झाल्यानंतर स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी स्कोलारी यांची हुर्यो उडवली होती. या सामन्यानंतर स्कोलारी यांनी ब्राझील फुटबॉल संघटना आपल्या भवितव्याचा निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया दिली होती.

६५ वर्षीय स्कोलारी ब्राझीलच्या विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलने २००२ मध्ये जर्मनीला नमवून फुटबॉलचे विश्वविजेतेपद पटकावले होते.

मागच्यावर्षी ब्राझीलने मायभूमीत झालेली कन्फेडरेशन कप स्पर्धा जिंकल्यानंतर ब्राझील सहाव्यांदा विश्वचषकावर नाव कोरेल अशी विश्वास निर्माण झाला होती. २०१२ मध्ये स्कोलारी यांच्याकडे ब्राझीलच्या संघ बांधणीची धुरा सोपवण्यात आली होती.

1 COMMENT

  1. सुंदर वार्तापत्र आणि खरोखरीच्या बातम्या ……उगाच राजकारणाची चंपी नाही तर आवश्यक गोष्टींची खुलासेवार चर्चा व निवेदन …….खूप छान !!!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version