Home महाराष्ट्र कोकण स्वयंरोजगारावर लक्ष केंद्रित करा

स्वयंरोजगारावर लक्ष केंद्रित करा

0

मुलींनी शिक्षण घेऊन केवळ संसारातच गुरफटून न राहता बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगारावर लक्ष केंद्रित करून आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक आर्थिक प्रगती साधली पाहिजे. 

पाचल – मुलींनी शिक्षण घेऊन केवळ संसारातच गुरफटून न राहता बचतगटाच्या माध्यमातून स्वयंरोजगारावर लक्ष केंद्रित करून आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक आर्थिक प्रगती साधली पाहिजे. बचतगटाचे कार्य हे आपल्या संसाराची घडी बसविण्यासाठी असले पाहिजे, असे प्रतिपादन जिजाई सेवा संघाच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांनी तळवडे येथे महिला मेळाव्यात केले.

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या वतीने राजापूर तालुक्यातील तळवडे येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सौ. राणे बोलत होत्या. दिवसभरातील आपल्या तिस-या महिला मेळाव्यात उपस्थित महिलांना संबोधित करताना सौ. राणे यांनी भविष्यातील विकासासाठी महिला शक्तीने डॉ. निलेश राणे यांच्या ठामपणे पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही या वेळी केले.

गेल्या वेळच्या निवडणूक प्रचार सभांपेक्षा या वेळी प्रचारसभांना मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे हे निलेश राणे यांनी खासदार म्हणून केलेल्या विकासाचे द्योतक आहे. आपलं काम स्वच्छ व सुंदर असावं, अशी आपली कायम सूचना निलेशला असते. त्यामुळे राणे साहेबांनी दिलेले प्रत्येक काम व समाजसेवेचे कार्य निलेश प्रामाणिकपणे पार पाडत आहे. ते अधिक सक्षम व कार्यक्षमपणे होण्यासाठी आपणा सर्वाचे त्याला पाठबळ आवश्यक आहे, असे सांगून सौ. राणे म्हणाल्या की, राणे साहेबांनी सिंधुदुर्गचा जो विकास पालकमंत्री म्हणून केलेला आहे.

तोच विकास रत्नागिरीचा होण्यासाठी आपण डॉ. राणे व ना. राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व भविष्यात केंद्राचा निधी मोठय़ा प्रमाणात आपल्या जिल्ह्यामध्ये आणून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी डॉ. निलेश राणे यांना पुन्हा एकदा निवडून देण्याचे आवाहन सौ. निलमताई राणे यांनी उपस्थित महिलांना केले.

या वेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रीय युवती काँग्रेसच्या पदाधिकारी धृवा लाकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा धनश्री मोरे, ज्येष्ठ महिला पदाधिकारी व माजी जि.प. सदस्या नीता चव्हाण, ताम्हाणे पं. स. सदस्या सिद्धाली मोरे यांनी महिला मेळाव्याला संबोधित केले तर

बचतगट या विषयावर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले. या वेळी माजी आमदार गणपत कदम, प्रसिद्ध उद्योगपती मनोहर खापणे, सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुमेधा पाताडे, जयश्री कदम, राजापूरच्या नगराध्यक्षा स्नेहल कुवेस्कर, राजापूर महिला तालुकाध्यक्षा सौ. अनामिका जाधव, नगरसेविका मुमताज काझी, गोठणे दोनिवडे सरपंच सावित्री कणेरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्याला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. सभेच्या पूर्वी सौ. निलमताई राणे यांनी परूळेतील प्रतिष्ठित ग्रामस्थ व उद्योगपती मनोहर खापणे यांच्या निवास्थानी भेट दिली. खापणे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले होते. सौ. राणे यांनी या वेळी खापणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version