Home महामुंबई ठाणे हा भार सोसवेना!

हा भार सोसवेना!

1

हा भार सोसवेना.. अशीच काहीशी अवस्था ठाणे परिवहन सेवेतर्फे ठाणे ते दादर दरम्यान चालवण्यात येणा-या वातानुकूलित बसची झाली आहे.

ठाणे – हा भार सोसवेना.. अशीच काहीशी अवस्था ठाणे परिवहन सेवेतर्फे ठाणे ते दादर दरम्यान चालवण्यात येणा-या वातानुकूलित बसची झाली आहे. या पाच बसच्या माध्यमातून प्रतिदिन परिवहनच्या गल्ल्यात अवघे ३० हजार रुपये गोळा होत असल्याने ही महागडी सेवा पांढरा हत्ती ठरत आहे.

काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या ताफ्यात आलेल्या १५ बसपैकी पाच बसच्या या मार्गावरून आठ फे-या चालवण्याचे परिवहनने ठरवले. या मार्गावर चांगला प्रतिसाद मिळेल, असे परिवहन व्यवस्थापनाला वाटले. पण ही बससेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येक दिवसाला एका बसमागे परिवहनला अवघे पाच हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. याच दरम्यान ठाणे-अंधेरी-बीकेसी मार्गावर परिवहनने सुरू केलेल्या दहा बसकडून त्यातल्या त्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बसकडून प्रतिदिन १ लाख वीस हजार रुपये उत्पन्न मिळत आहे. अनेकदा ठाणे ते दादर दरम्यान धावणा-या बसमध्ये मोठा कालावधी असतो. त्यामुळे प्रवाशांसाठी ते सोयीचे वाटत नसल्याने या मार्गावर तितकासा प्रतिसाद मिळत नाही. पण आम्ही याबाबत अभ्यास करून वेळापत्रकात बदल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे परिवहन प्रशासनाकडून सांगण्यात आले.

1 COMMENT

  1. आधी सामान्य प्रवाश्यांचा विचार करा? वातानुकुलीत बसेस पेक्षा सर्वसामान्य बसेस चालावा नक्की याचा सामान्य प्रवाश्यांना फायदा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version