Home देश हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू

हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू

0
Jammu & Kashmir map

जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात गस्तीवर असणा-या जवानांवर हिमकडा कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला.

जम्मू- जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात गस्तीवर असणा-या जवानांवर हिमकडा कोसळल्याने चार जवानांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

लडाखमधील दक्षिण ग्लेशियर भागात जवान गस्त घालत असताना बर्फाच्छदीत हिमकडा कोसळून चार जवानांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.

मात्र या जवानांना वाचवता आले नाही. या जवानांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी हंडर रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती उधमपूरस्थित संरक्षण दलाचे प्रवक्ते एस. डी. गोस्वामी यांनी दिली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version