Home टॉप स्टोरी पठाणकोट चकमक सुरूच

पठाणकोट चकमक सुरूच

1

पठाणकोट येथील हवाई तळावरील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सलग तिस-या दिवशीही सुरू आहे. 

पठाणकोट- पठाणकोट येथील हवाई तळावरील दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सलग तिस-या दिवशीही सुरू आहे. पठाणकोट हवाई दल तळावर सुरक्षा दलांनी सोमवारी आणखी दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. दरम्यान, या तळावर नेमके किती दहशतवादी लपले आहेत याची निश्चित माहिती नाही. या हल्ल्यासंदर्भातील सर्व माहिती देऊन पाकिस्तानला जाब विचारण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले.

या हवाई तळावर अधिकारी राहत असलेल्या दुमजली इमारतीत मोठा स्फोट झाला. यात दोन दहशतवादी ठार झाले. या इमारतीत आणखी दहशतवादी लपले आहेत का ? याचा शोध घेतला जात आहे. आमची मोहीम अंतिम टप्प्यात आहे. हा तळ पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत या परिसरात शोधमोहीम सुरूच राहील, असे एनएसजीचे महासंचालक मेजर जनरल दुष्यंत सिंग यांनी सांगितले. एनएसजी, लष्कर व हवाई दल, पंजाब पोलीस एकत्रितपणे या मोहिमेत सहभागी झाले आहेत. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी हा तळ सुरक्षित आहे. या तळावरील हेलिकॉप्टर, विमाने सुरक्षितस्थळी हलवली आहेत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान सीमेवरील सुरक्षाव्यवस्थेत त्रुटींचा अहवाल सादर करण्याचे आदेश केंद्रीय गृह खात्याने सीमा सुरक्षा दलाला सोमवारी दिले आहेत.

ड्रग माफियांच्या मदतीने दहशतवादी घुसले?

पाकिस्तानातातून भारतात अंमली पदार्थ, खोटय़ा नोटा व शस्त्रास्त्र पाठवणा-या माफियांच्या मदतीने दहशतवादी भारतात घुसल्याचे दिसत आहे. भारतात घुसताना या माफियांनी त्यांना मदत केल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला. यात काही सुरक्षा सैनिकही गुंतले असल्याचा संशय आहे, असे सूत्रांनी सांगितले. या दहशतवाद्यांना लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा हा पूर्वीच अंमली पदार्थाच्या तस्करांमार्फत पाठवलेला आहे. त्यानंतर दहशतवादी भारतात घुसले. या प्रकरणी पंजाबमधील तस्करांचाही शोध घेतला जात आहे

[EPSB]

पठाणकोट हल्ला-मोदी सरकारची त्रेधा »

पठाणकोट हवाई तळावरील धुमश्चक्री तिस-या दिवशीही सुरू असल्याने संरक्षण तज्ज्ञांनी सरकारचे वाभाडे काढले आहेत.

[/EPSB]

1 COMMENT

  1. मनोहर पर्रीकर साहेब मांडवीच्या नदीत मासे maarit बसले आहेत कि काय ? ह्या dahashat vaadyanche कंबरडेच का मोडून टाकत नाहीत ,???????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version