Home विज्ञान तंत्रज्ञान ‘हा’ नवा स्मार्टफोन अवघ्या २५१ रुपयात

‘हा’ नवा स्मार्टफोन अवघ्या २५१ रुपयात

1

रिंगिंग बेल्स या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त असा  ‘फ्रीडम २५१’  नवा स्मार्टफोन लाँच केला असून याची किंमत अवघी २५१ रुपये आहे. 

नवी दिल्ली- रिंगिंग बेल्स या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनची किंमत अवघी २५१ रुपये आहे. ‘फ्रीडम २५१’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे.

५०० पेक्षा कमी स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणण्याची कंपनीची योजना आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर या स्मार्टफोनचे लाँचिंग गुरूवारी करणार आहेत. या नव्या आणि स्वस्त स्मार्टफोनची विक्री गुरूवारपासून सुरू करण्यात येणार आहे.

‘फ्रिडम २५१’ या स्मार्टफोनमध्ये कमी किंमतीत आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत.

‘फ्रिडम २५१’ स्मार्टफोनचे फिचर्स

»  चार इंच डिस्प्ले

» ५४० x ९६० पिक्सल रेझोल्यूशन

» अॅन्ड्रोईड ५.१ लॉलीपॉप

» १.३ गिगाहर्टझ कॉडा कोअर प्रोसेसर

» एक जीबी रॅम

» ३.२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा

» ०.३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

» आठ जीबी इंटरनल मेमरी

» १४५० एमएएच बॅटरी

» किंमत २५१ रुपये

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version