Home विज्ञान तंत्रज्ञान आता एक रुपयात, एक जीबी, ३जी इंटरनेट

आता एक रुपयात, एक जीबी, ३जी इंटरनेट

1

आयडिया कंपनीने आपल्या युझर्ससाठी एक रुपयात एक जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- युझर्स वाढविण्यासाठी मोबाईल कंपन्या कमी किंमतीचे, चांगले फिचर्ससहीत स्मार्टफोन बाजारात आणत असतात. मात्र, आता मोबाईल कंपन्या कॉल दरातही सूट देत आहेत.

आयडिया कंपनीने आपल्या युझर्ससाठी एक रुपयात एक जीबी ३जी इंटरनेट देण्याची घोषणा केली आहे. आयडिया मोबाईल अॅपची ही सेवा अँड्राईट, आयओएस आणि विंडोज फोनवर असणार आहे.

या सेवेचा फायदा करून घ्यायचा असेल तर आयडिया मोबाईल अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यामध्ये मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करावा लागणार आहे.

त्यानंतर एक रुपयांचा रिचार्जचे ऑप्शन दिसेल आणि त्यावर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये एक जीबीपर्यंत ३ जी डाटा केवळ एक रुपयांत मिळणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version