Home एक्सक्लूसीव्ह मुंबई महापालिका चायनामेडच्या प्रेमात!

मुंबई महापालिका चायनामेडच्या प्रेमात!

0

महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात येणा-या २७५ ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ फक्त चायनामेड असल्याने तो प्रस्ताव नामंजूर केल्यांनतरही महापालिकेचे ‘चायना’ प्रेम कमी झालेले नाही.

मुंबई- महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात येणा-या २७५ ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ फक्त चायनामेड असल्याने तो प्रस्ताव नामंजूर केल्यांनतरही महापालिकेचे ‘चायना’ प्रेम कमी झालेले नाही. आता तर महापालिका चायनामेड मोबाईल डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे मशीन खरेदी करण्यास निघाली आहे.

केईएम, शीव व नायर या तीन प्रमुख रुग्णांलयांसाठी या मशीन्स खरेदी करण्यात येत आहे. या चायनामेड मशीनची दुरुस्ती व देखभाल करणे शक्य नसल्याने ही यंत्रे भंगारात जात असल्याने भारतीय बनावटीची यंत्रे खरेदी करण्याचे स्पष्ट आदेश स्थायी समितीने दिल्यानंतरही प्रशासनाने चायनामेड मशीन खरेदीचा घाट घातला आहे. त्यामुळे २७५ मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटरप्रमाणे या एक्स-रे मशीनचा प्रस्ताव आता स्थायी समिती धुडकावून लावते का, हेच पाहायचे आहे.

महापालिकेच्या केईएम, सायन, बाई यमुनाबाई लक्ष्मण नायर धर्मादाय पालिका रुग्णालय, १ उपनगरीय रुग्णालये, कुपर रुग्णालय आदींसाठी ‘मल्टिपॅरामीटर पेशंट मॉनिटर’ २७५ यंत्रे खरेदीचा प्रस्ताव होता. यात यंत्रपुरवठा, उभारणी, चाचणी व कार्यान्वित करण्यासाठी तीन वर्षाचा हमी कालावधी व पाच वर्ष वार्षिक देखभाल असे सुमारे १३१ कोटींचे कंत्राट होते. हे यंत्र रुग्णांच्या ईसीजी, ब्लडप्रेशर, ऑक्सिजन सॅच्युरेशन, ईटीसीओटू, रेस्पिरेशन, तापमान आदी परिमाण निरीक्षणसाठी या यंत्राचा वापर केला जातो. पालिकेच्या रुग्णालयांत अनेक यंत्रे चायनामेड असल्याने त्यांची देखभाल होत नाही.

या चायनामेड कंपनीचे एजंट वारंवार बदलले जात आहेत. त्यामुळे अशाप्रकारे चायनामेड यंत्रे खरेदी करून पालिकेचे आर्थिक नुकसान केले जात आहे. ही खरेदी यंत्रे चायनामेडच असल्याने वैद्यकीय सेवासुविधांवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.

मात्र, या मशीनचा प्रस्ताव फेटाळल्यांनतर पुन्हा मध्यवर्ती खरेदी खात्याने, रुग्णांच्या शरीरअंतर्गत विकारांच्या निदानाकरता आवश्यक एक्स-रे काढण्यासाठी मोबाईल डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे मशीन विथ प्लॅट डिटेक्टर यंत्र खरेदीचा निर्णय घेतला आहे. एकूण ९ एक्स-रे मशीन खरेदी करण्यात येणार असून केईएम, सायन आणि नायर या रुग्णालयांना प्रत्येकी तीन मशीन दिल्या जाणार आहेत.

या मशीनच्या खरेदीसह पाच वर्षाचा देखभाल खर्च अशा प्रकारे जपानमधील कोनिका मिनोल्टा हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ७ कोटी ७५ लाखांचे कंत्राट दिले जात आहे. मोबाईल डिजिटल रेडिओग्राफी एक्स-रे मशीन विथ प्लॅट डिटेक्टर मशीनचे उत्पादक आयएमडी ही चायना कंपनी आहे. त्यामुळे चायनामेड एक्स-रे मशीन खरेदीचा घाट प्रशासनाने घालून एक प्रकारे स्थायी समितीलाच आव्हान दिले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version