Home दिवाळी संपादकांची संवेदनशील, सजग अक्षर दिवाळी

संवेदनशील, सजग अक्षर दिवाळी

1

समाजातील प्रत्येक घटकांचा जाणीवपूर्वक विचार करून प्रत्येकाला समान न्याय देतानाच आपले वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून सातत्याने नव्या विषयांवर सडेतोड भाष्य करणा-या महाराष्ट्रातील आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांचे अन् मराठी न्यूज चॅनेलचे ज्येष्ठ संपादक आपली दिवाळी नेमकी कशी साजरी करतात.

समाजातील प्रत्येक घटकांचा जाणीवपूर्वक विचार करून प्रत्येकाला समान न्याय देतानाच आपले वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून सातत्याने नव्या विषयांवर सडेतोड भाष्य करणा-या महाराष्ट्रातील आघाडीच्या मराठी वर्तमानपत्रांचे अन् मराठी न्यूज चॅनेलचे ज्येष्ठ संपादक आपली दिवाळी नेमकी कशी साजरी करतात. लक्ष्मी पूजनालाही वेळेत घरी जाणे शक्यच नसते, पाडव्याला मिळणा-या हक्काच्या सुट्टीचा सदुपयोग ते कसा करतात? त्यांच्या घरच्यांच्या खास करून सहधर्मचारिणीच्या अपेक्षा ते किमान दिवाळीला तरी पूर्ण करतात का..? दिवाळी या सणाचा अर्थ या प्रत्येकाच्या लेखी काय आहे..? हे जाणून घेणारा दै. ‘प्रहार’च्या वतीने केलेला महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग.. वाचकांकरिता एक अनोखी दिवाळी भेट..

माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते.. ते कुठे दस्तावेजात लिहिलेले नाही.. तरीही बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, महात्मा जोतिबा फुले, प्र. के. अत्रे आदी संपादकांनी वर्तमानपत्राला लोकशाहीतील एक प्रभावी अस्त्र बनवले.. आपल्या धारधार बोच-या, अन् नेमक्या अग्रलेखांतून समाजातील वा राजकारणातील अपप्रवृत्तींवर लेखणीचे दखलपात्र प्रहार केले..

आजही या ज्येष्ठ नेत्यांची ही परंपरा अव्याहतपणे सुरू आहे.. काळ बदलला.. वैज्ञानिक प्रगतीची कवाडे खुली झाली.. सोशल मीडिया प्रवाही झाला.. डिजिटल युगात एका क्लीकवर जग आपल्या नजीक आले.. घरात बसून जगातल्या घडामोडी प्रत्येक सेकंदाला जरी कळत असतील तरी आजही आपले महत्त्व आणि प्रभाव टिकवून ठेवण्यात मराठी वर्तमानपत्रे आघाडीवर आहेत. मुंबईतून मराठी हद्दपार होते आहे किंवा मराठी वर्तमानपत्रांना वाचकच मिळत नाही, असे म्हणणारे लाख असतील, पण आजही मराठी वर्तमानपत्राला लाखोंच्या संख्येने वाचक मिळतो आहे.. काळानुरूप जशी जगण्याची, व्यक्त होण्याची, अभिरुची बदलते अगदी तसेच वाचनाच्याही पद्धती, लिखाणाचे प्रकार बदलत गेले.. ते अधिक प्रवाही, आव्हानात्मक झाले.. अचूक अन् मार्मिक लेखनाचा वाचक आजही चोखंदळता टिकून आहे, म्हणूनच तर अगदी ७५ रुपयांपासून ते ५०० रुपये किमतीचा दिवाळी अंक केवळ विषय, आशय अन् लेखकांची निवड आणि त्यांचा दर्जा पाहून खरेदी केला जातो.. त्यावर चर्चासत्रे रंगतात..

मुळातच माणूस हा समाजप्रिय, समूहप्रिय आहे.. त्याला संवेदनशीलतेने जपलेली नाती अधिक भावतात.. भले कुणी म्हणत असेल की, मुंबईचे स्पिरीट मेले.. त्याची जागा विकृतींनी, राजकारण्यांच्या स्वार्थीपणाने घेतली तरीही आजही माणुसकीच्या पणत्या पेटवल्या जातातच.. मग त्या निर्भया, श्वेताकरता असोत वा एलफिन्स्टन पुलावरच्या अपघातानंतरच्या असोत..

तीव्र स्पर्धेत आजही मराठी वाचन, मराठी भाषा अन् मराठी वर्तमानपत्रांचा प्रभाव टिकवून ठेवणे तसे आव्हानात्मकच आहे.. आजही वर्तमानपत्रांचे अग्रलेख आपल्या लेखणीची ताकद अन् आदराचे स्थान टिकवून आहेत.. छापण्यात येतं ते सत्यच या विश्वासाला सार्थ ठरवणारी पत्रकारिता काहीशी अवघड असली तरी अशक्य नाही.. हे दाखवून देत संपादकपदाचा काटेरी मुकुट धारण करून समाजप्रबोधनाचे व्रत सक्षमपणाने निभावणारे संवेदनशील, अभ्यासू संपादक दै. पुण्यनगरीच्या राही भिडे, दै. लोकसत्ताचे गिरीश कुबेर, दै. महाराष्ट्र टाइम्सचे अशोक पानवलकर, दै. लोकमतचे दिनकर रायकर, दै. पुढारीचे सुरेश पवार, दै. नवशक्तीचे सुकृत खांडेकर, आयबीएन लोकमतचे प्रसाद काथे, ‘साम’चे संजय आवटे, झी २४ तासचे डॉ. उदय निरगुडकर, एबीपी माझाचे राजीव खांडेकर यांच्यासह अनेक संपादक आज महाराष्ट्रात आपली जबाबदारी सक्षमपणे निभावत आहेत..

खरे तर पत्रकार अन् संपादक यांच्याविषयी आजही समाजात एकप्रकारचे औत्सुक्य असते.. बातमीची अन् संपादकीयची ताकद ज्याला समजली आहे, अशांना त्याचा धाक वाटतो, तर अनेकांना संपादकच समाजात काही चांगले बदल घडवू शकतो याचा विश्वास वाटतो.. अंकाच्या ले-आऊटपासून ते वाचकांच्या पत्रांपर्यंत, लेखक निवडीपासून ते कॉलमचे विषय अन् नावांची चॉईस करेपर्यंत, पानांचे क्रम ठरवण्यापासून ते बातम्यांचा प्राधान्यक्रम, सकाळी सहा वाजल्यापासून अंकातल्या किरकोळ अन् गंभीर चुका, वितरणाला उशीर झाला, कारण काय तर अंक प्रिटिंगला उशीर गेला.. अमूक एक घटना, कमी कव्हरेज मिळाले, फोटोच नाहीत.. आज अचानकच दोघांची विकली ऑफ तर दोघांच्या रजा.. कमीत कमी मनुष्यबळावर दर्जेदार अंक, तितकीच पाने अशी कसरत करत सण असो वा घरातील महत्त्वाचे कार्य..

अशा अनेक पाय-यांवर खंबीरपणे आपल्या वर्तमानपत्राचा प्रमुख या नात्याने जबाबदारी पार पाडतानाच.. नवे विषय, नवे तंत्रज्ञान, नव्या घडामोडी, देश-विदेशातील घटनांचे परिणाम.. मग ती नोटाबंदी असो वा जीएसटी, चीनचे आक्रमण वा पाकिस्तानच्या कुरघोडय़ा, कोरियाचे अणुबॉम्ब चाचणी ज्या ताकदीने हाताळली जाते त्याच ताकदीने सैराटचे १०० कोटींचे यश, साहित्यिकांचे पुरस्कार वापसी, पत्रकार, विचारवंतांच्या सरेआम हत्या, अथवा बीगबीचे ७५ सेलिब्रेशन, कोहलीचे रेकॉर्ड ब्रेक क्रिकेट वा महिला क्रिकेटची कामगिरी अगदी प्रत्येक घटकांचा जाणीवपूर्वक विचार करून प्रत्येकाला समान न्याय देतानाच..

आपले वैचारिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून सातत्याने नव्या विषयांवर केलेले सडेतोड भाष्य करणा-या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मराठी वर्तमानपत्राचे अन् मराठी न्यूज चॅनेलचे ज्येष्ठ संपादक आपली दिवाळी नेमकी कशी साजरी करतात, लक्ष्मी पूजनाला तर वेळेत घरी जाणे शक्यच नसते, पाडव्याला मिळणा-या हक्काच्या सुट्टीचा सदुपयोग ते कसा करतात, त्यांच्या घरच्यांच्या खासकरून सहधर्मचारिणीच्या अपेक्षा ते किमान दिवाळीला तरी पूर्ण करतात का.. दिवाळी या सणाचा अर्थ या प्रत्येकाच्या लेखी काय आहे.. हे जाणून घेतानाच.. त्यांच्यामार्फत दै. प्रहारच्या वाचकांना सामाजिक संदेशासोबतच काही निवडक ज्येष्ठ साहित्यिकांच्या दिवाळी सेलिब्रेशन अन् या संवेदनशील संपादकीय दिवाळी यांचे अनोखी दिवाळी भेट देत आहोत.. महाराष्ट्रातला हा बहुधा पहिलाच प्रयोग ठरावा..

[EPSB]

 परदेशातील भारतीयांची स्वदेशी नोकरीला अधिक पंसती

परदेशात नोकरी मिळवावी आणि तिथेच स्थिरस्थावर व्हावे, असे स्वप्न भारतातील अनेक तरुण पाहतात. 

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version