Home क्रीडा फ्रान्स अंतिम १६ संघांत

फ्रान्स अंतिम १६ संघांत

0

गटवार साखळीत (अ गट) बुधवारी अल्बानियावर २-१ असा विजय मिळवत फ्रान्सने युरो चषक फुटबॉल २०१६ स्पर्धेच्या अंतिम १६ संघांत प्रवेश केला.

मार्सेली- गटवार साखळीत (अ गट) बुधवारी अल्बानियावर २-१ असा विजय मिळवत फ्रान्सने युरो चषक फुटबॉल २०१६ स्पर्धेच्या अंतिम १६ संघांत प्रवेश केला. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. यंदाच्या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरी गाठणारा फ्रान्स पहिला संघ आहे.

पदार्पणात खेळणा-या अल्बानियाविरुद्ध फ्रान्सचे पारडे जड होते. मात्र बॉगडॅन स्टँकूने ‘पेनल्टी’वर अल्बानियाचे खाते उघडल्याने फ्रेंच चाहत्यांमध्ये चिंता होती. प्रतिस्पर्ध्याना गोल करण्यापासून रोखण्यात त्यांच्या बचावफळीला चांगलेच यश आले होते.

मात्र शेवटच्या मिनिटाला अँटोनी ग्रीझमन आणि दिमित्री पायेटने गोल करताना फ्रान्सला अप्रतिम विजय मिळवून दिला. रोमानियाविरुद्ध ‘लेट’ गोल करताना पायेटने रोमानियाविरुद्धच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

निसटत्या का होईना, सलग दुस-या विजयामुळे फ्रान्सने (६ गुण) आगेकूच केली. मात्र अल्बानियाचे आव्हान गटवार साखळीत संपुष्टात येणार, हेही नक्की झाले. त्याचा हा सलग दुसरा पराभव आहे.

‘अ’ गटातून बाद फेरीसाठी स्वित्झर्लंडलडने दावेदारी पेश केली आहे. दोन सामन्यांतून एक विजय आणि एका बरोबरीसह त्यांचे ४ गुण झालेत. बुधवारी त्यांनी रोमानियाविरुद्ध त्यांना बरोबरीत समाधान मानावे लागले.

पहिल्या आणि दुस-या स्थानी असलेले फ्रान्स आणि स्वित्झर्लंडलड संघ गटवार साखळीतील तिस-या लढतीत रविवारी (१९ जून) भिडतील. ही लढत स्वित्झर्लंडलडसाठी महत्त्वपूर्ण आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version