Home महामुंबई ‘मेडिकल कौन्सिल’च्या निवडणुकीचा आज निकाल

‘मेडिकल कौन्सिल’च्या निवडणुकीचा आज निकाल

0

वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’(एमएमसी) निवडणूक यंदा राजकीय पक्षांच्या सहभागामुळे अटीतटीची ठरली. 

मुंबई- वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’(एमएमसी) निवडणूक यंदा राजकीय पक्षांच्या सहभागामुळे अटीतटीची ठरली. पक्षीय हस्तक्षेप आणि मतदानाची घसरलेली टक्केवारी यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे. याची २३ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

सेंट जॉर्ज दंत महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात सकाळी ९ वा.पासून मतमोजणीला सुरुवात होईल. ‘महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल’च्या नियम १९६७ आणि ‘एमएमसी’(पहिले सुधारित) नियम २००२अंतर्गत पारंपरिकरीत्या मतांची मोजणी होणार आहे. याशिवाय नियमांनुसार उमेदवारांना मतमोजणीसाठी उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राशिवाय सभागृहात प्रवेश दिला जाणार नाही, असे लेखी पत्र कौन्सिलने सर्व उमेदवारांना पाठवले आहे.

एमएमसीच्या नऊ जागांसाठी राज्यात १८ डिसेंबरला मतदान झाले. यासाठी ४९ डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत राज्यभरातील ८५ हजार डॉक्टर मतदानाचा हक्क बजावणार होते. पण मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील तीस हजार डॉक्टरांपैकी फक्त २,२८९ डॉक्टरांनी मतदान केले.

तर राज्यातील ८५ हजार डॉक्टरांपैकी केवळ २०,१४६ डॉक्टरांनी मतदान केले होते. ‘एमएमसी’मध्ये एकूण १८ सदस्य आहेत. यातूनच नऊ जणांची निवड होणार आहे. यात चार माजी अधिकारी आणि पाच जण राज्य सरकारने नियुक्त केलेले डॉक्टर असतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version