Home टॉप स्टोरी जनावरांच्या डॉक्टरने माणसाचे केलेले ऑपरेशन म्हणजे नोटाबंदीचा निर्णय

जनावरांच्या डॉक्टरने माणसाचे केलेले ऑपरेशन म्हणजे नोटाबंदीचा निर्णय

1

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा एखाद्या जनावरांच्या डॉक्टराने माणसावर केलेली शस्त्रक्रिया आहे.

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा एखाद्या जनावरांच्या डॉक्टराने माणसावर केलेली शस्त्रक्रिया आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया झाली असली तरी माणूस दगावला असल्याचे सांगत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयावर तोफ डागली.

[poll id=”1598″]

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाचे चलन, रिझव्‍‌र्ह बँकेवरचा विश्वास आणि अर्थव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. केंद्रातल्या सरकारचा स्वत:वरच विश्वास नाही, त्यामुळे नोटाबंदीनंतर आतापर्यंत ६० वेळा निर्णय बदलले आहेत.

नोटाबंदीच्या या निर्णयामुळे कॅशलेस व्यवहाराची सुविधा देणा-या परदेशी कंपन्यांना किती फायदा झाला याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यावे, असा सवाल प्रभारी मोहन प्रकाश यांनी केला आहे. गांधी भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नोटाबंदी आणि कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या मुद्दयावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. परदेशी शक्ती देशाची धोरणे ठरवत असून परदेशी कंपन्यांच्या फायद्यासाठी कॅशलेस व्यवहार लोकांवर लादला जात आहे.

पंतप्रधान मोदी या परदेशी कंपन्यांचे ब्रँड अ‍ॅम्बॅसेडरप्रमाणे वागत आहेत, असे मोहन प्रकाश म्हणाले. नोटबंदीच्या निर्णयानंतर बँकेच्या रांगेत १२५ पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. नैसर्गिक संकटामुळे कोणाचा मृत्यू झाल्यास सरकार त्याला मदत करते पण नोटाबंदीच्या या मोदी निर्मित संकटामुळे मृत्यू पावलेल्या लोकांबद्दल सरकारने संवेदनेचा साधा एक शब्दही काढला नाही, असे मोहन प्रकाश म्हणाले.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक शहरातील पंरपरागत उद्योग बंद झाले आहेत. आग्रा येथील चामडयाची पादत्राणे तयार करण्याचा उद्योग, फिरोजाबाद येथील बांगडी उद्योग, सांगली येथील चांदीची भांडी व दागिने तयार करण्याचा उद्योग, धारावी येथील अनेक छोटे उद्योग, भिवंडी, इचलकरंजी येथील हँडलूम आणि पॉवरलूम उद्योगांना मोठा फटका बसला आहे.

अनेक कामगारांच्या नोक-या गेल्या आहेत. हजारो कुटुंबांवर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. शेतक-यांचे नुकसान झाले असून शेतमाल, भाजीपाला व फळांना भाव नसल्याने शेतकरी भाजीपाला रस्त्यावर टाकत आहेत. लोकांची खेरेदीची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन घटेल आणि अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो असा इशारा मोहन प्रकाश यांनी दिला.

1 COMMENT

  1. मोहन प्रकाशजी अहो चोरांनी लपविलेला पैसा आणि सोने इन्कम टॅक्स वाल्यानी किती पकडले ते तुम्ही वाचलेत का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version