Home देश गोहत्येवर सरसकट बंदीची मागणी चुकीची

गोहत्येवर सरसकट बंदीची मागणी चुकीची

1

संपूर्ण देशात गोहत्या बंदी घालणे चुकीचे आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. 

नवी दिल्ली- संपूर्ण देशात गोहत्या बंदी घालणे चुकीचे आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. गोमांस खाणा-यांनाही सावरकर दोषी समजत नव्हते, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्लीतील नॅशनल म्युझियममध्ये शरद पवार यांचे आत्मचरित्र ‘अपनी शर्तोंपर’चे (हिंदी आवृत्ती) प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भागवत यांच्या गोहत्या बंदीच्या मागणीला स्पष्ट विरोध केला आहे.

उपयुक्तता संपुष्टात आलेल्या गाईंची हत्या करून गोमांस खाणा-यांना मी दोषी समजत नाही, असे सावरकरांनी म्हटल्याचा दाखला पवार यांनी दिला. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. उपयुक्तता असेपर्यंत तिचा सांभाळ करणे शेतक-याला शक्य असते. पण, उपयुक्तता संपुष्टात आल्यानंतर ती शेतक-याला ओझं होत असते, असेही पवार म्हणाले.

1 COMMENT

  1. मा.शरद पवार साहेबांला स्वा.सावरकरांचे विचार पटायला लागले हि आनंदाची बाब आहे.
    ज्या प्रमाणे त्यांनी स्वा.सावरकरांचे गाई विषयाचे विचार समजून घेतले , तसेच जर हिंदुत्वाचे विचार अभ्यासले तर ‘हिंदुराष्ट्र’ संकल्पनाही पटेल.
    गाई विषयी बोलायचे तर, थोडा अभ्यास सावरकरांचा आणि पवार साहेबांचाही कमी पडला आहे.
    गाई दिवसाला तिच्या शेण व गोमुत्रातून २०० ते ३०० रुपये मिळवून देऊ शकते,
    आणि शेण व गोमुत्र ती मरेपर्यंत देतच राहते.
    एका गाईच्या आधारे किमान ७ एकर शेती , रासायनिक खते व कीटक नाशके न वापरता आपण करू शकतो….
    बहुत काय लिहणे ……….. आपण सुद्न्य आहात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version