Home महाराष्ट्र ‘समृद्धी’बाधित शेतक-यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

‘समृद्धी’बाधित शेतक-यांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

0

महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शेतक-यांनी कंबर कसली असून जबरदस्तीने आमच्या जमिनी घेतल्या तर सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

नाशिक- महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेला समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करण्याच्या सरकारच्या धोरणाविरोधात शेतक-यांनी कंबर कसली असून जबरदस्तीने आमच्या जमिनी घेतल्या तर सामूहिक आत्महत्या करू, असा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडीसह परिसरातल्या गावांमध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून सरकारी अधिका-यांच्या माध्यमातून मोजणी केली जात आहे. या मोजणीला विरोध करणा-या शेतक-यांना पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेऊन त्यांच्यामध्ये दहशत निर्माण केली जात आहे. या विरोधात शेतक-यांनी कंबर कसली आहे.

सरकारी अधिका-यांच्या विरोधात नाशिकच्या शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे तक्रार केली आहे. सध्या सुरू असणारी जमिनीची मोजणी थांबवावी, अशी मागणी शेतक-यांनी केली आहे. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी सामूहिक आत्महत्येचा इशारा दिला आहे. पुढचे चार-पाच दिवसांत सिन्नर तालुक्यात आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version