Home क्रीडा आर. अश्विन गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी

आर. अश्विन गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी

0

भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत (रँकिंग) अव्वल स्थान मिळवले.

दुबई- भारताचा ऑफस्पिनर आर. अश्विनने आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत (रँकिंग) अव्वल स्थान मिळवले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दुस-या डावात सात विकेट घेणा-या अश्विनने पाकिस्तानचा लेगस्पिनर यासिर शाहला मागे टाकले. अँटिगा कसोटीतील अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने अष्टपैलूंमध्येही अव्वल स्थान कायम ठेवले.

पहिल्या कसोटीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीमुळे अश्विनच्या खात्यात पाच रेटिंग गुणांची भर पडली. ताज्या क्रमवारीत ८७६ गुणांसह तो अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी वर्षअखेरच्या रँकिंगमध्ये अश्विन पहिल्या स्थानी होता.

पाकिस्तानच्या यासिर शाहचे (८३२ गुण) अव्वल रँकिंग क्षणभंगूर ठरले. तो पाचव्या स्थानी फेकला गेला आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (८७५ गुण) थेट दुसरे स्थान मिळवले. तिस-या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे अँडरसनचा सहकारी स्टुअर्ट ब्रॉड तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आहे. अव्वल दहामध्ये अश्विनसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आहे.

आयसीसी अष्टपैलू क्रमवारीमध्ये अश्विनने (४२७ गुण) अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्याच्यासह ‘टॉप टेन’ अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजाच्या रूपाने आणखी एक भारताचा क्रिकेटपटू आहे. विनू मंकड आणि कपिल देव यांच्यासह अष्टपैलूंमध्ये अव्वल स्थान पटकावणारा अश्विन केवळ तिसरा भारतीय आहे.

फलंदाजांमध्ये अव्वल दहामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने (९२५ गुण) अव्वल स्थान मिळवले आहे. इंग्लंडचा ज्यो रूट (९०१ गुण) दुस-या स्थानी आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version