Home महाराष्ट्र कोकण कोकणात ७४४ तलाठी पदे नव्याने भरणार

कोकणात ७४४ तलाठी पदे नव्याने भरणार

1

गावागावात महसुली कामकाज जलदगतीने होण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने तलाठी पदासाठी जम्बो भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी- गावागावात महसुली कामकाज जलदगतीने होण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने तलाठी पदासाठी जम्बो भरती घेण्याचा निर्णय घेतला आहे. १९८४ सालानंतर पहिल्यादांच ३ हजार ८४ नव्या तलाठयांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. यात कोकणात ७४४ पदे भरण्यात येणार आहेत.

बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा करताना पाटील यांनी ही माहिती दिली. महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे यापुढे सहा गावांना एक तलाठी मिळणार आहे. राज्यात सध्या एकूण १२ हजार ३२७ तलाठी सजे आहेत. त्यात वाढ केल्यानंतर १५ हजार ४११ तलाठी सजे होतील. त्यापैकी कोकणात सध्या १ हजार ३९१ तलाठी आहेत.

त्यात ७४४ची वाढ करून २ हजार १३५ करणार आहेत. तर नाशिकमध्ये ६८९, पुणे विभागात ४६३ची वाढ, औरंगाबादमध्ये ६८५ची वाढ व अमरावतीत २५ पदे भरली जाणार आहेत. आगामी मंत्रिमंडळ समितीत या संदर्भात प्रस्ताव मांडला जाईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version